शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

वरूड-मोर्शीच्या मिरचीला रसायनांचा फटका, ‘तेजा’नेही केले घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:43 PM

शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

नरेंद्र निकम ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी (अमरावती) : शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक्षेत्र घटविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून परिचित असलेल्या वरूड व मोर्शी तालुक्यातील शेतकरी एक दशकापासून मिरची उत्पादनाकडे वळला आहे. अलीकडे या पिकाचे पारंपारिक बियाणे मोडित निघाले असून, सुधारित वाण व प्रगत तंत्रज्ञानामुळे वाढलेले उत्पादन विकण्यास राजुरा बाजारशिवाय अन्य सक्षम बाजारपेठ नसल्यामुळे तोडणीच्या चुकाºयासाठी वेगळी व्यवस्था लावावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण वाढली आहे. मिरचीला अपेक्षित दर नसल्याने अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यातील राजुराबाजारला लागून असलेल्या गावांतील सुमारे दोन हजार उत्पादक व १० ते १५ हजार मजूर वर्ग प्रभावित झाला. २००८ नंतर पहिल्यांदा दीड महीन्यापासून बाजारात मंदीचे सावट आहे. तोडे बंद होऊन मिरची लाल होण्याची वाट पाहिली जात आहे. त्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही घटले आहे. मोर्शी तालुक्यात ८० ते ९० हेक्टरवर यावर्षी मिरचीची लागवड असून, पुढील वर्षी यात घट होण्याची शक्यता आहे. संकरित बियाणे, रासायनिक खते, औषधी व ड्रिप इरिगेशनमुळे एका हंगामात एकरी ३०० ते ४०० क्विंटल मिरची निघते. परंतु, बाजारपेठ नाही, निर्यात नाही, कमी दराची रेल्वे वाहतूक नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकाला सध्या मिळत असलेला ६ रुपये किलोचा दर २० रुपयांपर्यंत जावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.उत्पादन वाढले; बाजारपेठ तोकडीनवनवीन जाती सुधारित प्रगत तंत्रज्ञानाने मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले. एका एकरात ३० ते ४० क्विंटलचा तोडा १५ दिवसांत येतो. त्यानुसार लागवडीचे क्षेत्रही वाढले. वरूड तालुक्यातील राजुराबाजार ही मिरचीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तथापि, अन्य ठिकाणी स्वतंत्र बाजारपेठ नसल्याने उत्पादनाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.सुधारित बियाणे तेजकमी उत्पादन देणारे मिरचीचे पारंपरिक वाण जाऊन सुधारित बियाणे बाजारात मिळायला लागल्यामुळे नामशेष झाले. ब्लॅसिड, पंतनगर हे एवढे तिखट वाण नव्हते. त्यामुळे ते अधिक खपत होते. परंतु, सुधारित वाणाची एक मिरचीही खाणे शक्य नाही.मर्यादित वाहतूक क्षमतामिरचीच्या वाहतुकीसाठी राजुराबाजार येथून रेल्वे लाइनची मागणी होत आहे. रेल्वेअभावी देशाच्या कानाकोपºयात जाणारा माल जागीच पडून आहे. उलट आंध्रातून थेट मुंबईत मिरची येते. चिल्लर बाजारात मात्र तुलनेने तेजी असल्यामुळे मिरचीचे भाव पडल्याचे सर्वसामान्यांच्या लक्षातही येत नाही.रसायनांना परदेशात नकारमिरचीचा तोडा झाला की, शेतकरी कृषिनिविष्ठा विक्रेत्यांच्या उत्पादनवाढीच्या आमिषाला बळी पडून खताचे डोज, रासायनिक फवारणी करून दुसरा बार मिळवितो. परदेशात सेंद्रिय पिकांना मागणी आहे. त्यामुळे या आघाडीवर वरूड-मोर्शीची मिरची मागे पडते.नवीन तिखट वाणामुळे खपावर तसाही विपरीत परिणाम झाला. शासनाने निर्यातीवर बंधने लादून शेतकरी नामशेष करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सर्वच पारंपरिक बियाणे नामशेष झाली.- प्रदीप भोंडे, अडते, राजुराउत्पादन वाढले. तसा खर्चही वाढला. देशात सक्षम कृषीमाल खरेदी यंत्रणा नसल्यामुळे त्यांच्यावरही विस्थापीत होण्याची वेळ आली आहे.- विलास ठाकरे, शेतकरी, येरला, ता. मोर्शी.