लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते सृष्टी यांचा सन्मानचिन्ह, शिवचरित्र व शाल श्रीफळ देऊन भव्य नागरी सन्मान करण्यात आला. तेव्हा सभागृहातच नव्हे, तर बाहेर उपस्थितांनीदेखील टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. सोहळ््याला श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, रेशीम संचालनालयाच्या आयुक्त भाग्यश्री बानाईत, उपमहापौर संध्या टिकले, डॉ. पंजाबराव देशमुख समाजसेवी व अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समितीचे अध्यक्ष गजानन देशमुख आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सृष्टी म्हणाल्या, तुम्ही १५ मिनिटे शांत बसा. दिवसभराचे नियोजन आखा. त्यानंतर ते नियोजन पूर्ण करा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला घाबरू नका. सूक्ष्म नियोजन करताना यापूर्वीच्या परीक्षांचे पेपर अभ्यासा. त्यांचा सराव करा. अभ्यासात सातत्य ठेवल्यास कोणत्याही परीक्षेला सामोरे जाता येते, असे त्या म्हणाल्या.सत्काराला उपस्थित हजारोंच्या संख्येने तरूणाईला बघताच मन अगदी भरून आले, असे सृष्टी भावनात्मक बोलून गेल्यात. चित्रपटाची तुतारी आज माझ्यासाठी वाजत असल्याने मन गहिवररून आले आहे. शाळेत असतानाच आपण आयएएस व्हायचे ठरविले होते. त्या स्वप्नाचा पाठलाग केला. शाळेत प्रत्येक कार्यक्रमात आपण हिरीरीने सहभाग घेतला. इंजिनिअरिंगला असताना स्वप्नपूर्तीची आठवण झाली. यापूर्वी आपण दिल्ली कधीच पाहली नव्हती. मात्र, आयएएस मुलाखतीसाठी दिल्लीत जाण्याचा प्रथमच योग होता, असे त्या म्हणाल्या. आयुष्यात शिस्त महत्त्वाची असून, ती अंगिकारा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक गजानन देशमुख, संचालन क्षीप्रा मानकर, आभार विजय देशमुख यांनी मानले.
मोठी स्वप्न पाहा, साकारण्याचा प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 1:32 AM
स्वप्न मोठी बघा. ती साकारण्यासाठी श्रम, जिद्द बाळगून ते प्रयत्न करा. मोठी स्वप्न पाहायला घाबरू नका, असा मोलाचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मधून देशातून मुलींमधून प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी शनिवारी तरूणाईला दिला.
ठळक मुद्देसृष्टी देशमुख : यूपीएससीत देशात मुलींमधून प्रथम आल्याबाबत सत्कार