अमोल कोहळे पोहरा बंदीइंदला बीटमध्ये सोमवारी जंगलास आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने गस्ती वाढविली आहे. जंगलात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. मोकास्थळी वनरक्षक तैनात केले जात आहे. पोहरा, चिरोडी, माळेगाव हे तीन वर्तुळ जंगलाने संपन्न आहे. या जंगलात वाघ, बिबट, मोर, हरिण, निलगाय या वन्यपशूंचे अस्तित्व आहे. समृद्ध जंगल असल्याने या भागात गुरे चारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पावसाळ्यापूर्वी जंगलाला आगी लावून नवीन चारा निघते, यामुळे गुरे चराई करणारे अवैध शिकारी करणारे जंगलाचे मारक ठरत आहे. सोमवारी लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक वनसंरक्षक अमरावती राजेंद्र बोंडे वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. पडगव्हाणकर यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली असून इंदला, घातखेडा, बोडणा या भागातून आग लावण्याचा संशय बळावला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलाला आग लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
जंगलात आगी लावणाऱ्यांवर ‘वॉच’वनरक्षकांची गस्त वाढली : जंगलात प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी
By admin | Published: April 21, 2016 12:08 AM