शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाहेरगावांहून आलेल्या व्यक्तींवर राहणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 6:00 AM

आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : १५ एप्रिलपर्यंत तलाठी, ग्रामसेवक ठेवणार नोंद

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बाहेरगावाहून गावात येणाºया व्यक्तींची तलाठी व ग्रामसेवकामार्फत १५ एप्रिलपर्यंत नोंद ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी खबरदारीचा उपाय म्हणून याविषयीचे आदेश सर्व तहसीलदार व बीडीओंना शुक्रवारी दिले.आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार, १५ एप्रिलपर्यंत गर्दी किंवा लोकांचा समुह एकत्र जमू न देण्याबाबतच्या दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. यानुसार शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आढावा बैठकही आता शक्यतो व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा दूरध्वनीवर घेण्यात याव्यात, याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेचे आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी शाळांमध्ये स्वच्छतेसंबंधी काळजीबाबत संबंधितांना कळवावे तसेच लोकांची अनावश्यक गर्दी जमू नये यासाठी काळजी घेण्याचे निर्देश सर्व शासकीय विभागप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.महापालिका आयुक्तांची बैठकमहापालिका आयुक्त आयुक्त संजय निपाणे यांनी गुरुवारी सायंकाळी पाचही सहायक आयुक्त, शहर अभियंता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भाव शहरात होऊ नये, यासंबंधी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सूचना दिल्या. या अनुषंगाने महापालिकेची सर्व आरोग्य केंदे्र, उपकेंद्रांची स्वच्छता करण्यात आलेली आहे व आरोग्य अधिकाºयांना मास्क पुरविण्यात आल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी सांगितले.‘क्वॉरंंटाइन’साठी वृद्धाश्रमाचे अधिग्रहणकोरोनाग्रस्त भागातून (क्वॉरंटाईन) एकाच वेळी अनेक व्यक्ती शहरात दाखल झाल्यास त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यासाठी व्यवस्थेचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्हीसीदरम्यान दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत वलगावनजीक संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाची पाहणी केली. मोकळी जागा, पाण्याची व्यवस्था असल्याने ६४ खोल्यांचे हे वृद्धाश्रम शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी अधिग्रहीत केले.‘आयसोलेशन’ कक्ष म्हणजे काय?जेव्हा विशिष्ट आजाराचे लक्षण असलेल्या व्यक्तीला उपचाराची गरज असते व दुसऱ्याला हा आजार होऊ नये, यासाठी स्वतंत्र कक्षात तिच्यावर उपचार केले जातात, याला ‘आयसोलेशन’ कक्ष म्हणतात. जिल्हा सामान्य रुग्णालयातील या कक्षात पाच बेड व डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय (पीडीएमसी) येथे चार बेडची व्यवस्था करण्यात आल्याचे सीएस डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले.‘अट्टा’ला मागितली प्रवाशांची माहितीअमरावती जिल्हा टूर्स अँड ट्रॅव्हल असोशिएशन (अट्टा) च्या पदाधिकाºयांची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकाºयांनी बोलाविली. यामध्ये अमरावती येथून परदेशात गेलेल्या व परदेशातून गत १५ दिवसांत जिल्ह्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती मागविण्यात आली. कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झालेले आहे. याचा बुकिंग खर्च व परतावा मिळू शकत नसल्याने राज्य शासनाने तो द्यावा आणि यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. बैठकीला आरडीसी नितीन व्यवहारे, संघटनेचे अध्यक्ष भूषण कोल्हे, उमेश उमप आदी उपस्थित होते.‘क्वॉरंटाइन’ कक्ष म्हणजे काय?विशिष्ट रोगाचा प्रादुर्भाव आहे व एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात १०० ते २०० व्यक्ती आल्या आहेत. त्यामुळे ती व्यक्ती आजारी नसली तरी तिला १४ दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. या कक्षाला ‘क्वारंटाइन’ कक्ष म्हणतात. जिल्ह्यात यासाठी वलगावजवळच्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील ६४ खोल्या शुक्रवारी अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना