शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मला गोळ्या झाडा मी मरणार नाही, तुम्हाला सोडणार"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
4
“देवेंद्र फडणवीस यांची ही ‘लाडका विनोद’ योजना आहे का?”; काँग्रेसची खोचक टीका
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
7
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
8
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
9
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
10
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
11
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
12
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
13
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
14
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
15
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
16
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
17
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
18
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
19
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप

नूतन वर्षाच्या स्वागतावर पोलिसांचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:19 PM

नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

ठळक मुद्देतगडा बंदोबस्त : चौकाचौकात फिक्स पॉईंट; टवाळखोर मद्यपींवर विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.थर्टी फर्स्टच्या बंदोबस्ताची धुरा सांभाळणाऱ्या शहर पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात तीनही पोलीस उपायुक्त, ४ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असे ६० पोलीस अधिकारी व ५०० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून शहरात पोलीस तैनात केले जाणार असून, मद्यप्राशन करून सुसाट वाहन चालविणारे, वादविवाद व छेडखानी सारख्या घटनांवर लक्ष देणार आहे. शहरातील विविध मार्गावरील मुख्य चौकात फिक्स पॉइंट लावून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. रात्रभर पोलिसांची प्रभावी गस्तही राहणार आहे. याशिवाय वाहतूक शाखेच्या पूर्व व पश्चिम विभागातील पोलीसही बंदोबस्तात सहभागी राहणार आहे. यंदा नूतन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील मद्यविक्रींची दुकाने व बियर बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे मद्यपींचे वाद होण्याची शक्यता आहे. दारू पिऊन होणारे वाद, अपघात आणि गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलीस रात्रभर कडेकोट बंदोबस्त ठेवणार आहे.रँश ड्राईव्हिंग नकोथर्टी फर्स्टचा आनंद साजरा करताना अनेक तरुण दुचाकींवर बसून जोरजोरात ओरडत सुसाट वाहने दामटतात. स्टंटबाजी करून दुसऱ्यांचेही जीव धोक्यात टाकतात. अशा स्थितीत अपघात घडतात. त्यामुळे जल्लोषाला गालबोट लागते. असे प्रकार घडू नयेत, याकडे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहे. रँश ड्राईव्हींग करू नका, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.पर्यटनस्थळांवर दामिनी पथकथर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी प्रेमीयुगुल शहरातील पर्यटनस्थळांचा आधार घेतात. अशावेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. मालखेड, वैष्णव देवी मंदिर, जंगलाचा परिसर, पोहरा, छत्री तलाव, वडाळी व मालटेकडी अशा आदी ठिकाणी दामिनी पथकाची सातत्याने गस्त राहणार आहे.मद्यपींची खैर नाहीमावळत्या वर्षाला निरोप व नवीव वर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्राशन करून जल्लोष करण्यात येते. अशावेळी अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पोलीस ड्रंक एन्ड ड्राइव्ह मोहीम राबविणार आहे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविली जाईल. ब्रिथ अ‍ॅनालाईझर मशिनद्वारे मद्यपींची तपासणी होईल. वाहतूक पोलिसांनाही मशिन देण्यात आली असून, ते चौकाचौकांत तपासणी नागरिकांची करणार आहेत.उड्डाणपूल बंद३१ डिसेंबरच्या रात्री राजापेठ ते इर्विन चौक व शिवाजी कॉलेज ते गाडगे नगर हे उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील. दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस तैनात राहतील. वाहनचालकाला उड्डाणपुलावरून जाण्यास मनाई केली जाणार आहे.