शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

दुष्काळात ‘जलदाह’! एप्रिलमध्ये स्थिती गंभीर

By admin | Published: April 12, 2016 12:06 AM

विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

गावागावांत पायपीट : लघुप्र्रकल्प कोरडे, मजीप्राला मर्यादा अमरावती : विभागातील अन्य चार जिल्ह्यांच्या तुलनेत भीषणता नसली तरी जिल्ह्यात एप्रिलअखेर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळला असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणून जिल्ह्यातील जलसंकटही गडद होऊ लागले आहे. पारा ४३-४४ डिग्री सेल्सियसच्या घरात असताना भर उन्हात हजारो नागरिकांना पायपीट करीत ‘जलदाह’ सोसावा लागत आहे. मागील महिन्यात राज्य शासनाने जिल्ह्यातील १९६७ गावांत टंचाई जाहीर केली. तद्वतच उपाययोजनाही जाहीर केल्यात. तथापि यातील अनेक उपाययोजना कागदावरच राहिल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील जलसंकट तीव्र होण्याचे दु:चिन्ह आहे. उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होतील तसातशी सिंचनप्रकल्पातील जलसाठ्यात घसरण होत जाईल व जलसंकटात भर पडेल, असे सध्याचे चित्र आहे. गेल्या ५ -६ वर्षापासून सततची नापिकी, अत्यल्प पाऊस आणि भरीसभर कोसळणारे सुलतानी संकट यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. बहुतांश ग्रामस्थांना घोटभर पाण्यासाठी मैलाचे अंतर गाठावे लागते. चिखलदऱ्याला फटकाअमरावती : चिखलदरा तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भयाण होत आहे. तलाव कोरडे पडल्याने मे महिन्यात अधिक भयावह स्थिति होणार आहे. तूर्तास तालक्यातील खडिमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारुबांधा, कुलंगणा, भांद्री, ढोमणबर्डा, कालपाणी व पस्तलाई या गावात शासकीय टॅँकरने पेयजलचा पुरवठा होत आहे. लघुप्रकल्पांमध्ये लघुत्तम जलसाठा असल्याने एप्रिलच्या शेवटी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठे जलसंकट उदभवणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचना तहसीलदार, तलाठ्यांनी सतर्क राहावे, टॅँकर फेऱ्यांच्या नोंदी ठेवाव्यात., ग्रामपातळीवर बैठका घेऊन आढावा घ्यावा., पाणी पुरवठा योजनेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, टंचाईची स्थिति लक्षात घेता अधिकचे नियोजन करावे, पाणीपुरवठा योजनांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, टंचाईग्रस्त गावांत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. १० कोटींचा आराखडा तरीही पायपीट अमरावती जिल्हापरिषदेने सुमारे ७०८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी विविध उपाययोजनांचा सुमारे १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यात सिंचनविहिरी, नळयाजेना, कुपनलिका, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, टॅँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहित करणे या उपाययोजनांचा समावेश आहे. तथापि अनेक गावात गावकऱ्यांची पेयजलासाठी पायपीट सुरु आहे. शहरातही केवळ दोन तास पाणीपुरवठा जिल्ह्यात सर्वदूर पाणीटंचाई जाणवत असताना अप्पर वर्धातील जलसाठ्यात झालेली घसरण पाहता शहरवासियांना मोठा फटका बसण्याचे संकेत आहेत. मजीप्राकडून तुर्तास केवळ दोन तास पाणी पुरवठा केला जातो. त्याही पाण्याचा दाब कमी असल्याने पेयजलाची साठवण होत नाही. महापालिकाक्षेत्रात मजीप्राच्या ग्राहक संख्येच्या तुलनेत ग्राहकांना १२० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना अनेक भागात पेयजल पोहोचत नाही. मे महिन्यात स्थिती गंभीर एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमानाने ४३ अंशाचा आकडा गाठल्यामुळे चैत्र, वैशाखात पाणीटंचाईची दाहकता वाढणार आहे. तुर्तास चिखलदरा तालुक्यातच टॅँकरने पाणीपुरवठा होत असला तरी एप्रिलच्या शेवटी व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टॅँकर्सची संख्या वाढणार आहे.