वरूड : दरवर्षी नागठाना धरणाचे पाणी चुडामन नदीत सोडले जात होते. यावर्षी झटामझिरी प्रकल्पातूम पाणी सोडण्यात निर्णय संबंधित विभागाने घेतला. परंतु, ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे पाणी सुटू शकले नाही. आता मंगळवारी पोलीस संरक्षणात चुडामन नदीत पाणी सुटणार आहे. दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यात नागठाणा धरणाचे पाणी चुडामन नदीत सोडले जाते.
पाणी न सोडल्यामुळे वरूड, अमडापूर, राजुरा बाजार, वाडेगाव, काटी, गाडेगाव, वघाड येथे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजू बहुरूपी, राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याबाबत अवगत केले.
झटामझिरी प्रकल्पाचे सुटणार पाणी
यावर्षी झटमझीरी प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा आहे. येथील पाणी शिल्लक असल्यामुळे चुडामन नदीत प्रवाहित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तथापि, आमच्या हक्काचे पाणी सोडू देणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकाऱ्यांनी अखेर पोलीस संरक्षण मागितले.