लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. पीठासीन सभापती नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, सदस्या गौरी देशमुख, पार्वती काठोळे, वित्त अधिकारी रवींद्र येवले, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, प्रमोद तलवारे व अन्य खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाभरात पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने ३०३ गावांत ३७३ विहिरी अधिग्रहित केल्यात. मात्र, यापैकी किती विहिरी कोरड्या पडल्या, असा मुद्दा सभापती बळवंत वानखडे, जयंत देशमुख यांनी उपस्थित केला. याबाबतची माहिती पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांची कोंडी झाली. यावर पदाधिकाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत पुढील सभेत माहिती सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांना दिले. शिवाय जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ ४०३ कुपनलिका व विंधनविहीरी मंजूर केल्यात.त्यापैकी ३०७ कुपनलिका व विंधन यशस्वी झाल्या. ३८ विंधनविहिरी कोरड्या पडल्या. १३ ठिकाणचे पाणी स्त्रोत आटल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाचे म्हणणे आहे. याचवेळी सदस्या गौरी देशमुख यांनी सालोरा येथील दिलेल्या स्थळाऐवजी अन्य ठिकाणी बोअर केल्याने या विभागात गौडबंगाल केल्याचा आरोप केला. यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी आरोप फेटाळला. याप्रकरणी चौकशीचे आश्वासन अध्यक्षांनी दिले.रोहयोंतर्गत पांदण रस्त्याची कामे रखडल्यामुळे नागरिकांना अडचणी होत असल्याचा मुद्दा जयंत देशमुख यांनी मांडला. सिंचन विभागाकडील जलयुक्त शिवाय योजना व सिंचन प्रकल्पाचेही मुद्दाकडे पदाधिकाºयांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सभेला पाणीपुरवठा संदीप देशमुख, अनूप खासबागे, दीपेंद्र कोराटे, दीपक डोंगरे व सर्व अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाईवर जलव्यवस्थापनात घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:52 AM
सध्या दुष्काळासोबतच पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईची सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशातच पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची फलश्रुतीबाबत जाब विचारत शुक्रवारी झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना पदाधिकारी व सदस्यांनी धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेत सभा : पदाधिकारी, सदस्यांनी विचारला जाब