लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : वर्धा नदी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असल्याने तिवसा येथे टॅँकरने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तिवसा शहराची पाणीटंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यापूर्वी उपाययोजना सुरू करण्याचे साकडे वानखडे यांनी घातले.तिवसा शहराला भारवाडीनजीक वर्धा नदीपात्रातून तसेच दिवंगत सतीश मारोतराव वानखडे यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पुरेल एवढा पाणीसाठा नदीला उपलब्ध आहे. पण, नदीवरील जॅकवेलचे सक्शन पाइप उघडे पडले आहेत. तिवसा, गुरुदेवनगर, भारवाडी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीतील जलसाठा कमी होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने तिवसा नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव वानखडे, पाणीपुरवठा सभापती मधुकर भगत यांनी नगरपंचायत प्रशासनासह बुधवारी वर्धा नदीच्या जॅकवेलची पाहणी केली तसेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जलस्रोताबाबत कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत मजीप्राकडून मार्गदर्शन उपलब्ध करावे, अशी मागणी वानखडे यांनी केली.तिवसा शहरातील ज्या भागात पाइप लाइन उपलब्ध नाही, अशा भागात जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने टँकर उपलब्ध करून द्यावे, ही मागणीदेखील वैभव वानखडे यांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकाºयांनी नगर विकास शाखेस दिले.जॅक वेलमधील तांत्रिक दोष दूर करातिवसा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या वर्धा नदीतील जॅकवेलमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी व नदीच्या पाण्याच्या पातळीत झालेली घट बघता, भूजल सर्वक्षण विभागाला मार्गदर्शन करण्यास सूचित करण्याची मागणी नगरपंचायतीमार्फत जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे. यासंदर्भाचे निवेदन पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार यशोमती ठाकूर तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे.
तिवस्याची पाणीटंचाईकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:38 AM
वर्धा नदी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असल्याने तिवसा येथे टॅँकरने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तिवसा शहराची पाणीटंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे.
ठळक मुद्देटँकरने पाणीपुरवठा करा : नगराध्यक्षांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी