शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शहरात पाण्याचा तुटवडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:32 PM

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस व ऊर्ध्व वर्धा धरणाचा मुख्य येवा असणाºया मध्य प्रदेशातदेखील पर्जन्यमान कमी झाल्याने प्र्रकल्पात सध्या ३९ टक्केच जलसाठा आहे. आगामी पाणीटंचाईच्या पार्र्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी ५५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. मात्र, प्रकल्पातच साठा कमी, त्या तुलनेत शहराची मागणी जास्त व शुद्धीकरण यंत्राची अपुरी क्षमता यामुळे आगामी काळात शहरावर जलसंकटाची गडद छाया आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : जिल्हाधिकाऱ्यांद्वारे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा ५१.५८ दलघमी पाणीसाठा आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस व ऊर्ध्व वर्धा धरणाचा मुख्य येवा असणाºया मध्य प्रदेशातदेखील पर्जन्यमान कमी झाल्याने प्र्रकल्पात सध्या ३९ टक्केच जलसाठा आहे. आगामी पाणीटंचाईच्या पार्र्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी ५५ दलघमी पाण्याचे आरक्षण केले आहे. मात्र, प्रकल्पातच साठा कमी, त्या तुलनेत शहराची मागणी जास्त व शुद्धीकरण यंत्राची अपुरी क्षमता यामुळे आगामी काळात शहरावर जलसंकटाची गडद छाया आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत २५ टक्के कमी पाऊस झाल्याने गावागावांतील पाण्याचे स्रोत आटायला लागले आहेत. शहरात वर्षभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. डिसेंबरअखेर जिल्ह्यातील २५५ गावांमध्ये पाणीटंचाई राहणार असल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे. जिल्ह्याच नव्हे तर विभागात सर्वांत मोठा असणाºया ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाची संकल्पीय क्षमता ५६४ दलघमी व पूर्ण संचय पातळी ३४२.५० दलघमी असताना प्रकल्पात सध्या ३३८.७८ मीटर म्हणजेच २२०.८४ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. ही टक्केवारी ३९.१५ आहे. विशेष म्हणजे, खरिपाच्या कपाशी व तुरीसाठी सध्या पाण्याची एक पाळी सोडण्यात आली. यासाठी ५५ दलघलि पाणी खर्च झाले व येत्या दोन आठवड्यात पुन्हा पाण्याची पाळी सोडण्यात येणार आहे. यासाठी ५५ दलघलि म्हणजेच उपलब्ध साठ्याच्या किमान सात टक्के पाण्याचा वापर होणार आहे. हरभºयाला किमान दोन पाणी मिळावे, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी आग्रही आहेत. त्यामुळे प्रकल्पात केवळ २५ टक्केच साठा शिल्लक राहणार आहे. धरणाच्या निर्मितीपासून गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे प्रकल्पात किमान पाच टक्के तरी मृत साठा गृहीत धरता २० टक्केच पाणी शिल्लक राहणार आहे. यामध्ये औद्यागिक वापरासाठी इंडिया बुल्सला १२३.५२ दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आगामी काळातील बाष्पीभवनात ६६ ते ६८ दलघमी पाणी वाया जाणार असल्याने प्रकल्पाला कोरड पडणार आहे. पाणीसाठा आरक्षित असला तरी तांत्रिक दोष, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची मागणी व त्या तुलनेत शुद्धीकरण केंद्राची अपुरी कार्यक्षमता यामुळे शहरासह जिल्ह्यात जलसंकट अटळ आहे.महापालिकेसाठी ४६ दलघमी पाणी आरक्षणऊर्ध्व वर्धा प्रकल्पात सध्या २२० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये शहराची मागणी लक्षात घेता १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१९ या एक वर्षाच्या कालावधीसाठी जिल्हाधिकाºयांनी ५१.५८ दलघमी पाणीसाठ्याचे आरक्षण केले आहे. १२ आॅक्टोबरला झालेल्या पाणी आरक्षण सभेत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अमरावती महापालिकेसाठी ४६ दलघमी, मोर्शी पाणीपुरवठा योजनेसाठी २.०५३ दलघमी, वरूड पाणीपुरवठा योजनेसाठी २.२५ दलघमी, ७० गावे (मोर्शी) पाणीपुरवठा योजनेसाठी ०.५० दलघमी, लोणी-जरूड प्रादेशिक योजनेसाठी ०.३० दलघमी, हिवरखेड योजनेसाठी ०.३० दलघमी, तिवसा योजनेसाठी ०.२० दलघमी पाण्याचे आरक्षण करण्यात आलेले आहे.जिल्हाधिकाऱ्यांद्वारे आरक्षित पाणीसाठावाई प्रकल्पातून पुसल्याकरिता ०.१७ दलघमी, पुसली प्रकल्पातून धनोडी, मालखेडकरिता ०.१, वºहा-कुºहा स्वतंत्र योजनेकरिता ०.४१८, जावरा, फत्तेपूर, नमस्कारीकरिता ०.५०, अंजनसिंगी-पिंपळखुट्याकरिता ०.१६८, नायगाव ०.०१५, दिघी महल्ले ०.०१५, आष्टा योजनेकरिता ०.०१, सोनोरा काकडे ०.०१५, दर्यापूर १५६ गावांच्या योजनेकरिता शहानूर प्रकल्पातून १६.८१, चांदूर रेल्वेकरिता मालखेड प्रकल्पातून १.६५, पुसली लघू प्रकल्पातून शेंदूरजनाघाटकरिता २.३३, पूर्णा प्रकल्पातून १०५ गावांच्या योजनेकरिता ३.७५, चांदी प्रकल्पातून नांदगाव खंडेश्वरकरिता १.१९, चंद्रभागा प्रकल्पातून अचलपूरकरिता ९.६१९, शेकदरी प्रकल्पातून वरूडकरिता ०.०५ व धवलगिरी प्रकल्पातून लोणीकरिता ०.१८२५ दलघमी पाणीसाठा आरक्षित आहे.शुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताणअमरावती शहरासाठी दररोज १२४ दलघलि पाण्याची मागणी आहे. मात्र, शहरासाठी असलेल्या शुद्धीकरण केंद्राची कार्यक्षमता दरदिवशी ९५ दलघलि असताना, ११० दलघलि पाण्याचा वापर केला जात केला जात असल्याने ते आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. आता ६१ दलघलि क्षमतेचे आणखी एक शुद्धीकरण केंद्र निर्माणाधीन आहे. याला किमान सहा महिने लागतील. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी मागणी वाढली तरी शुद्धीकरण केंद्राची कार्यक्षमताच नसल्याने शहराला पाणीटंचाईची झळ बसणार आहे.इंडिया बुल्ससाठी १२३.५२ दलघमी आरक्षणजिल्ह्याची तहान भागविणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून औष्णिक वीज प्रकल्पाकरिता १२३.५२ दलघमी पाण्याचे वार्षिक आरक्षण आहे. सिंचनासाठी २०० दलघमी, औद्योगिक वापरासाठी २४.७३५ दलघमी असे वार्षिक आरक्षण असले तरी प्रकल्पात पाणीसाठाच नसल्यामुळे सिंचनासाठी केवळ दोन पाळ्याच देण्यात येणार आहेत. प्रकल्पात मृत साठा (अनुपयुक्त) किमान १४४ दलघमी असल्याचा मोठा फटका आहे. याव्यतिरिक्त बाष्पीभवनात ६८ दलघमी साठा जाणार असल्याने यंदा प्रकल्पाला कोरड पडणार, असे चित्र आहे.शहरासाठी ४६ दलघमी साठ्याचे वर्षभरासाठी आरक्षण करण्यात आलेले असल्याने शहराला पाणीटंचार्ई भासणार नाही. सध्या आहे हीच परिस्थिती राहील. तांत्रिक दोष आल्यास उद्भवल्यास काही काळ पाणीपुरवठा विस्कळीत होतो.सुरेंद्र कोपुलवार, कार्यकारी अभियंता (मजीप्रा)