शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

पाणीटंचाई; उपाययोजना ८०० प्रस्ताावित, मंजूर फक्त ९६

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 22, 2023 5:54 PM

नळ योजनेच्या दुरुस्तीचे एकही काम सुरु नाही

अमरावती : मार्चपश्चात उन्हाची दाहकता वाढल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी ८०० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात ९६ उपाययोजनांना मंजूरी मिळालेली आहे. त्यापैकी ४४ पुर्ण झाल्यात तर ४४ अद्यापही प्रगतीत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे मे, जूनमध्ये पाणीटंचाईचे चटके बसणार आहे.

जिल्ह्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व पाणी पातळीत वाढ झाली. मात्र, मार्चमध्ये चांगलेच तापायला लागल्याने दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. याशिवाय काही भागात खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाद्वारा करण्यात आले.

यावर्षी नळयोजनेच्या विशेष दुरुस्तीची १३५ कामे सुचविण्यात आलेली असतांना ५० कामे मंजूर आहेत. मात्र, एकाही कामाला सुरुवात झालेली नाही. तात्पूरत्या पुरक नळ योजनेची १० कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी चार कामांनाच मंजुरी मिळालेली आहे. एकही काम सुरु नाही. खासगी ४२९ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतांना पाच उपाययोजनेला मंजूरी मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.तहान लागल्यावर खोदणार विहीर

पाणीटंचाईचा सामना करण्यास २०७ नवीन विंधन विहीर, कूपनलिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. यापैकी ३५ ला मंजूरी मिळालेली आहे. यापैकी एकही काम सुरु झालेले नाही, त्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती