लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका नागरिकांना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया योजनांचे जलस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत. ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. पाणी टंचाईची समस्या चिखलदरा तालुक्यात टंचाईग्रस्त गावाची संख्या बरीच आहे. त्यानंतर इतर तालुक्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध असल्याने टंचाईची दाहकता कमी करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार उपायोजना सुरू केल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव परिसरातील पाणी असलेल्या विहिरी अधिग्रहित करून ते ग्रामस्थांना पुरविले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे जि.प. पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले. मेळघाटसोबतच आता सपाटीवरील गावातून विहीर अधिग्रहण, नळदूरूस्ती योजना, कूपनलिका आदींसाठी प्रस्ताव येत आहेत. एकंदर जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली असून, विहीर अधिग्रहणासोबत टँकरने पाणीपुरवठा करून प्रशासन गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.१२ गावांना टँकरने पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.गत आठ दिवसांत टँकरची संख्याही वाढली असून सध्या १२ गावांना ९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यात चिखलदरा तालुक्यातील पस्तलाई, भांद्री, सोनापूर, तारूबांदा, पाचडोंगरी, कोयलारी, मनभंग, सोमवारखेडा, गौलखेडा, नागापूर व मोर्शी तालुक्यातील सावरखेडा गावांचा समावेश आहे.१७० गावांत कूपनलिकापाणीस्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील १७० गावांमध्ये १८१ कूपनलिकांपैकी ४९ गावांत सध्या कामे सुरू आहे. याशिवाय १८२ गावांमध्ये नळयोजना, दुृरूस्तीची कामे सुरू आहेत. मात्र विहीर खोलीकरण, गाळ काढणे असे एकही काम सध्या तरी सुरू नसल्याचे या अहवालातील माहितीनुसार दिसून येत आहे.अप्परवर्धा प्रक ल्पात ३६.७१ टक्के जलसाठाअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्परवर्धा प्रकल्पामध्ये रविवारअखेर ३२१ दलघमी जलसाठा असून, त्यातील २०७ दलघमी जलसाठा उपयुक्त आहे. उपयुक्त जलसाठ्याची ही टक्केवारी ३६.७१ टक्के असून, गतवर्षी याचवेळी या प्रक ल्पात ३७.५८ टक्के जलसाठा होता.
पाणीटंचाईची धग वाढली, १४३ विहिरींचे अधिग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:08 PM
उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावांतील १४३ विहिरी अधिग्रहित केल्या असून, या विहिरींचे पाणी ग्रामस्थांसाठी खुले केले असून, टँकरचीही मागणी वाढत आहे.
ठळक मुद्देपाणीस्त्रोत आटले : १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा