शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 6:37 PM

गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.

- प्रदीप भाकरे

अमरावती : गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे.  पाणीपुरवठा विभागानुसार, राज्यात २ फेब्रुवारीपर्यंत २ हजार ४१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केवळ २०२ टँकर्स पेयजलाचा पुरवठा करीत होते. सरासरीपेक्षा कमी पाऊस, सिंचनप्रकल्पांना पडलेली कोरड पाणीटंचाईत भर पाडणारी ठरली आहे. तूर्तास राज्यातील १,६८८ गावे व ३,७३९ वाड्यांना १६५ शासकीय व १८७६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवार २०१८ मध्ये राज्यातील २३४ गावे व ३ वाड्यांनाच पाणीटंचाईची झळ पोहोचली होती. यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने वाढ झाली असताना पाणीटंचाई असलेल्या गाववाड्यांमध्ये तर २५ पटीने वाढ झाली आहे. तूर्तास, ठाणे विभागातील ५ गावे व ११ वाड्यांना ७ टँकरने, नाशिक विभागातील ५२२ गावे व २०९० वाड्यांमध्ये ५७६ टँकर, पुणे विभागातील १९८ गावे व १३२२ वाड्यांमध्ये २०० टँकर, औरंगाबाद विभागातील ९०४ गावे व ३१६ वाड्यांमध्ये १२०० टँकर, अमरावती विभागातील ५९ गावांमध्ये ५८ टँकर अशा एकूण २ हजार ४१ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला जात आहे.

जलसाठा घटलाराज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे विभागातील एकूण ३,२६७ सिंचन प्रकल्पांमध्ये ४ फेब्रुवारीअखेर केवळ ३८.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ५४.९४ टक्के होता. जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नोंदीनुसार, अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पांमध्ये ३५.९४ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये ११.७५ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये १९.९३ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६१.९ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ३५.६५ व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी