लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ राबविलेल्या, राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च या निधीतून भागविला जाईल.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २७ मार्च रोजी नाशिक विभागाला ३०२.९३ लाख, औरंगबाद विभागाला ४२१.१० लाख, अमरावती विभागाला ७३१.३५ लाख असे एकूण १४५५.३९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४४.१८ लाखांतून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. या तिन्ही जिल्ह्यांतील नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ६८७.१७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अमरावती, नाशिक आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करीत असताना तो उपयोजनानिहाय वितरित होईल, याची दक्षता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठाअकोला जिल्ह्यातील ६४ गावांना ५४ टँकरने, वाशिम जिल्ह्यातील ७ गावांना ७ टँकरने, बुलडाणा जिल्ह्यातील १८ गावांना १८ टँकरने, तर यवतमाळातील २२ गावांना अशा एकूण १११ गावांना १०१ टँकरने तूर्तास पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एकाच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची नोंद विभागीय आयुक्तालयात करण्यात आली आहे.
वऱ्हाडात पाणीटंचाई; निवारणार्थ ७.३१ कोटींची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:24 PM
वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
ठळक मुद्दे१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठा