लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला. आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर गावकऱ्यांनी जल्लोष केला.दुपारी ३ वाजता यशोमती ठाकूर १३ गावांतील गावकऱ्यांसह विभागीय आयुक्तालयात दाखल झाल्या. आयुक्तांसमोर पाण्यासाठी प्रभावी मागणी नोंदविली गेली. पाणी मिळेपर्यंत आम्ही हलणार नाही, हलू देणार नाही, असा पवित्रा आमदार ठाकूर यांनी घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी सायंकाळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी मनीषा खत्री, सिंचन खात्याचे कार्यकारी अभियंता, संबंधित बीडीओ, वीज अधिकारी, अशी संबंधित यंत्रणा पाचारण केली. पाणीपुरवठ्यात अडथळा ठरणाºया सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी समोरासमोर सोडविण्यासाठीचे आदेश देऊन त्यांनी आमदार यशोमती ठाकूर यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये पाणीपुरवठ्याचा आदेश दिला. या आदेशानुसार, शक्य असेल तेथे नदीपत्रातून, नसेल तेथे टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.या गावांना होणार पाणीपुरवठामोर्शी तालुका : तुळजापूर, निंभार्णी, शिरूळ, पिंपळखुटा, भांबोरा, येवती, कवठाळ, शिरलस, लेहगाव, लिहिदा, शिरखेड, नया वाठोडा, सावरखेड, काटपूर, नेरपिंगळाई, वाघोली, लेहगाव, राजूरवाडी.तिवसा तालुका : दापोरी, वरूडा, करजगाव, जावरा, फत्तेपूर, सातरगाव, इसापूर, काटपूर, नमस्कारी, वणी, ममदापूर, वरखेड, तारखेड, भारवाडी नवी, भारवाडी जुनी, ठाणाठुणी, आखतवाडा, धामंत्री, कौंडण्यपूर, कुºहा, उंबरखेड, निंभोरा, देलवाडी, डेहणी, तिवसा, गुरुदेवनगर, मोझरी, तळेगाव ठाकूर, मसदी, सुरवाडी, अनकवाडी, शिदवाडी, मार्डा, बोर्डा, जहागीरपूर, वºहा, चेनुष्टा, घोटा.अमरावती तालुका : डिगरगव्हाण, जळका शहापूर, शेवती जहागीर, गोपाळपूर, सालोरा, देवरा शहीद, देवरा पुनर्वसन, माहुली जहागीर, नांदुरा.पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन खात्याचाचऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचे पाणी सोडण्याचा निर्णय सिंचन अधिकाºयांनीच घेतला. त्यासाठीची आवश्यक प्रक्रियाही पूर्ण केली गेली. पाणी किती सोडायचे, हेदेखील संबंधित अधिकाºयांनीच ठरविले, अशी माहिती सिंचन खात्याच्या कार्यकारी अभियंत्याने सभागृहात दिली. पाणी सोडण्याचा निर्णय कुणाचा होता, या आमदार यशोमती यांच्या प्रश्नावर ही माहिती दिली गेली.पीयूष सिंह म्हणाले, प्रॉमिस !पाणी पुरविण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी रात्री दिला. पुन्हा त्यात अडचण तर येणार नाही ना, याबाबत यशोमती ठाकूर खातरजमा करून घेत होत्या. विभागीय आयुक्त म्हणाले, तसे घडणार नाही. यशोमती ठाकूर त्यांना म्हणाल्या, प्रॉमिस? त्यावर पीयूष सिंह उत्तरले - प्रॉमिस!पुसदा, आमला,डिगरगव्हाणचे मुद्दे निकालीपुसदा येथील किरकोळ दुरुस्त्या त्वरित करा, डिगरगव्हाणचे बुडातून गंजलेले विजेचे खांब चार दिवसांत बदलवा, आमला येथील अपूर्ण पाइप लाइनच्या कामासंबंधीचे प्रशासकीय कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण करा, असे आदेश पीयूष सिंह यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना दिले. आमदार यशोमती यांनी या तिन्ही गावांतील मुद्दे गावकºयांना सादर करण्यास सांगितले होते.पाणी वितरणाच्याबैठकीचे बोलावणे नाहीपाणी वितरणाची बैठक कोण घेते, ती कधी होते, असे प्रश्न आमदार ठाकूर यांनी जिल्हाधिकाºयांना केले. बैठक होत असून, आमदारांनाही त्यात बोलविले जाते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. परंतु, अशा कुठल्याही बैठकीत पाच वर्षांत मला कधीच बोलविले गेले नाही, असा मुद्दा ठाकूर यांनी मांडला.
आयुक्तांना घेराव, ६६ गावात पोहोचणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 1:21 AM
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पातून सोडलेले पाणी गावांमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखण्याच्या खेळीनंतर यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. त्यांनी मागणी केलेल्या सर्व ६६ गावांमध्ये मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचा आदेश अखेर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित यंत्रणेला दिला.
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांच्या आंदोलनाला यश : रात्री ७.३० वाजता निर्णय; कलेक्टर, सीईओ उपस्थित