शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भरपावसाळ्यातही मेळघाटातील नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा; स्रोत मृतच

By जितेंद्र दखने | Updated: July 17, 2024 19:51 IST

भूजलपातळीत वाढ न झाल्याने टंचाई कायम

अमरावती : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत आतापर्यंत २२४ मिमी पाऊस झाला आहे. मात्र, विखुरलेल्या स्वरूपातील या पावसाने टंचाईग्रस्त गावांतील भूगर्भातील जलपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे मेळघाटातील नऊ गावांतील ६ हजार २८३ नागरिकांची तहान अद्यापही टँकरच्या पाण्यावरच भागविली जात आहे. टँकरग्रस्त सर्व नऊ गावे चिखलदरा तालुक्यातील आहेत.

उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटत असल्याने निर्माण होणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर तोडगा म्हणून जिल्हा प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था करण्यात येते. यंदा मार्च महिन्यापासून टँकर सुरू करण्यात येतात. पावसाळ्यात ती साधारणतः बंद केली जातात. यंदा अजूनही नऊ गावांमध्ये टँकर सुरूच आहेत. ही सर्व गावे मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील आहेत. यंदा १ जून ते ११ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २२४ मिमी पाऊस झाला असून, सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. 

तथापि, आतापर्यंत झालेला पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असल्याने त्याचे वितरण, सर्व भागात संतुलित प्रमाणात चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांना पाण्याचे टँकर सुरू आहेत. चिखलदरा तालुक्यात दरवर्षी पावसाची सरासरी अधिक राहते. यंदा आतापर्यंत या तालुक्यात २९९ मिमी पाऊस झाला असून, सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत त्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत झालेले नाहीत. परिणामी पाण्याची टंचाई कायम आहे, असे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.

या नऊही गावांतील पाण्याचे स्रोत जिवंत झालेले नाहीत. त्यामुळे तब्बल ६ हजार २८३ नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढून स्रोत जिवंत होण्यासाठी अजून महिना लागणार आहे. पावसाच्या सरासरीचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. ‘या’ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठाटँकरग्रस्त गावांमध्ये मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, गवळीढाणा (कोरडा), स्कूलढाणा (कोरडा), कालापांढरी (कोरडा) या गावांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती