शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

पाणी पुरवठ्याचा निधी शौचालयावर खर्च

By admin | Published: June 01, 2017 12:07 AM

झेडपीला पाणी पुरवठ्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला ४ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला परत केला गेला.

जिल्हा परिषद : १५ कोटींची रक्कमही अखर्चितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : झेडपीला पाणी पुरवठ्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्राप्त झालेला परंतु अखर्चित राहिलेला ४ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला परत केला गेला. मात्र, प्रशासनाने तो वळती करून घेण्यात विलंब लावल्याने पाणी पुरवठा विभागाने परस्परच या निधीचा वापर शौचालयांच्या निर्मितीसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. दोन वर्षापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी ४ कोटींचा रूपयांचा निधी मिळाला होता. मात्र हा निधी अखर्चित राहिला. नियमानुसार तो जिल्हाधिकाऱ्यांना परत केला गेला. मात्र, निधी वळता करण्यास विलंब लागल्याने झेडपीच्या पाणी पुरवठा विभागाने शासनाची परवानगी न घेताच यानिधीचा वापर स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत शौचालय बांधकामासाठी केल्याचा आरोप जि.प.सदस्य रविंद्र मुंदे यांनी केला आहे. जिल्ह्यात १५० गावांमध्ये पाणीटंचाई आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी विविध लेखाशिर्षातून जि.प.ला प्राप्त १५ कोटी ८९ लाख ८२ हजार ६८० रूपयांचा निधी दोन वर्षात खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, तो खर्च करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनासाठी जिल्हा नियोजन समिती व शासनाकडून दोन वर्षांपूर्वी पाणी पुरवठा विभागाला निधी उपलब्ध झाला होता. यातून नळ पाणी पुरवठा, हातपंप विद्युत (खासदार निधी), आमदार स्थानिक विकास निधीतून नळ पाणीपुरवठा योजना, सर्वसाधारण अनुदान निधीतून अनुसूचित जाती घटकांसाठी पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरूस्ती अशी विविध कामे अपेक्षित होती. हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात १५ कोटी ८९ लाख ८२ हजार ६८० रूपये अखर्चित असल्याच्या गंभीर प्रकाराला दोषी कोण, असा प्रश्न विरोधी पक्षाने केला आहे. स्वच्छ भारत मिशनकडे ४ कोटी रूपये वर्ग करण्याचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते. त्यानुसार निधी वळता केला. अखर्चित १५ कोटी खर्च करण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्याने मार्चपर्यंत तो खर्च झाला नाही. मात्र हा निधी पाणी पुरवठा योजनेवरच खर्च केला जाईल. निधी परत जाणार नाही- के.टी.उमाळकरकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा पाणी पुरवठ्याचे ४ कोटी शौचालयांसाठी वापरताना शासनाची परवानगी घेतली नाही. जिल्ह्यात पाणीटंचाई असताना १५ कोटींचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च होणे अपेक्षित होते. मात्र, यात प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे याला जबाबदार कोण, पदाधिकारी की प्रशासन, याचा जाब द्यावा.- रविंद्र मुंदे विरोधी पक्षनेता, झेडपी