फोटो पी १९ हिरदामल
चिखलदरा :
तालुक्यातील बदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हिरदामल येथे चार दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा शनिवारी दुपारी २ वाजता सुरू करण्यात आला. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली होती.
बदनापूर ग्रामपंचायत अंतर्गत हिरदामल या ८०० लोकसंख्येच्या गावातील आदिवासी नागरिकांना चार दिवसांपासून पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावरील एका नाल्यातील विहिरीचे गढूळ पाणी ओढून आणावे लागत असल्याचे चित्र होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने शनिवारी वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाच्यावतीने तात्काळ दखल घेत दुपारपर्यंत बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.
कोट
हिरदामल येथील पाणीपुरवठा मोटर जळाल्यामुळे बंद होता. तात्काळ दुरुस्तीचे आदेश देण्यात आले होते. शनिवारी दुपारी तो सुरळीत करण्यात आला.
- प्रकाश पोळ, बीडीओ, चिखलदरा
===Photopath===
190621\img-20210619-wa0058.jpg
===Caption===
हिरदामल येथील पाणीपुरवठा सुरळीत