पेयजल योजना : निधी देण्याचे ठरले, मात्र अंमलबजावणी नाहीअमरावती : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ८ नवीन पाणीपुरवठा योजनांचे आराखडे शासनाला सादर करण्यात आले. पण, शासनाने २९ जून २०१५ पूर्वीचा कार्यारंभ आदेश दिलेल्या योजनांसाठी निधी देण्याचे सूत्र स्वीकारले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील आठ हजारांहून अधिक नवीन पाणीपुरवठा योजना अडगळीत पडल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री पेयजल योजना प्रस्तावित करण्यात आली असली तरी त्यासंबंधीची नियमावली अद्याप निश्चित झालेली नाही. शासनाकडून दरवर्षी मंजूर होणाऱ्या आराखड्यात प्रत्येक जिल्ह्यात सर्वसाधारणपणे काही २४० नवीन पाणी योजनांची प्रक्रिया सुरू होती. मात्र यंदाचे आर्थिक वर्ष वाया जाणार काय, अशी स्थिती तयार झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा प्रत्येकी ५० टक्के वाटा असतो मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी राज्याचा निधी नवीन पाणी योजनांसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातून सुमारे ११ हजार १८४ पाणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २ हजार ८३५ योजनांची कामे सुरू आहेत. त्यामधील ४८३ योजनांचा पाणीपुरवठा जिल्हानिहाय सुरू झाला आहे. उद्दिष्टांच्या तुलनेत पाणीपुरवठा सुरू झाल्याचे प्रमाण ६ महिन्यांत १७ टक्क्यांपर्यंत साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
ग्रामीण पेयजल योजनेतील पाणीपुरवठा योजना अडगळीत
By admin | Published: November 01, 2015 12:25 AM