लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : भारनियमन वाढल्याने स्थानिक नगरपंचायतीला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यांना नियमित पेयजल मिळावे, यासाठी भारनियमन कमी करावे, अशी मागणी तिवसा नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.तिवसा शहराला मुख्य व पूर्णत: पाणीपुरवठा करणाºया फिडरवर नेहमीच ब्रेक डाऊन, भारनियमन नित्याने सुरू आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा बाधित होतो. ५ व्या, ६ व्या दिवशी नागरिकांना पाणी मिळत आहे. यामुळे भारनियमन कमी करावे, असे निवेदन अधीक्षक अभियंता सुहास मेत्रे, ग्रामीणचे कार्यकारी अभियंता मोहोड यांना देण्यात आले. चर्चेअंती कार्यकारी अभियंता यांनी तिवसा उपकार्यकरी अभियंता तायडे यांना याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. यावेळी तिवसा नगर पंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद्र विघ्ने, नगरसेवक दिवाकर भुरभुरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर राऊत, उमेश राऊत, अंकुश बनसोड आदी मंडळी उपस्थित होती.
तिवस्यात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:48 PM
भारनियमन वाढल्याने स्थानिक नगरपंचायतीला होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
ठळक मुद्देवैभव वानखडे : भारनियमन बंद करा, अधीक्षक अभियंत्यांना निवेदन