शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पाणवठे तुडूंब, वन्यजीवांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:12 AM

अमरावती : यंदा मार्च, एप्रिल ते १५ मे यादरम्यान सूर्य चांगलाच तापला. ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद ...

अमरावती : यंदा मार्च, एप्रिल ते १५ मे यादरम्यान सूर्य चांगलाच तापला. ४३ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, गत चार दिवसांपासून वातावरण आल्हाददायक आहे. अशातच वादळी पाऊस पडला. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे तुडूंब भरले असून, वन्यजीवांना तृष्णातृप्तीकरिता दिलासा मिळाला आहे.

मेळघाटात हल्ली वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्यासाठी ७४८ पाणवठे आहेत. यात नैसर्गिक ४४९ तर, कृत्रिम २९९ पाणवठे निर्माण करण्यात आले आहे. सिपना, गुगामल, अकोट व अकोला वन्यजीव विभाग अंतर्गत पाणवठ्यांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ अधिकारी स्तरावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच राखीव जंगल, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या उभी होते. मात्र, आता वादळी पाऊस कोसळल्याने पाणवठे तुडूंब भरलेत. पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची शिकार अथवा विषप्रयोग होणार नाही. यासाठी वनपाल, वनमजूर, वनपरिक्षेत्राधिकारी अशी सुरक्षेसाठी साखळी तयार करण्यात आली आहे. पाणवठ्याचे ‘डे टू डे‘ अहवाल उपवनसंरक्षकांकडे पाठविण्यात येत आहे. पाणवठ्यांच्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मेळघाटात ७२ वाघ असल्याची नोंद आहे.

---------------

बॉक्स

मेळघाटातील हे आहेत मुख्य वन्यप्राणी

मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, हरिण, काळवीट, सांबर, तडस, मोर, लांडोर, हरियल पक्षी, नीलगाय यासह जलचर प्राणी, सरपटणारे प्राण्यांचा समावेश आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५०० हेक्टर कोअर परिसर, १२६८ हेक्टर बफर झोन आणि १९० हेक्टर परिसर पर्यटन क्षेत्र आहे. सिपना वन्यजीव अंतर्गत १६१, गुगामल २६४, अकोट १९४, अकोला वन्यजीव विभागात १२९ पाणवठे आहेत.

---------

कोट

गत आठवड्यात मेळघाटचा दौरा केला. काही नैसर्गिक पाणवठ्यांवर वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसून आले. अतिशय सुंदर असे चित्र होते. हल्ली पावसामुळे मेळघाटात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर उन्हाळ्यासारखी स्थिती नाही.

- जयोती बॅनर्जी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प