गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एरवी फक्त भीक मागण्यासाठी पसरणारे हात आणि माथ्यावर ‘चोर’ असल्याचा शिक्का घेऊन उघड्यावर जगणारी पारधी समाजातील ४५० मुले स्वकौशल्याचा वापर करून टिपºया बनवीत आहेत. ‘दांडिया’शी दूरदूरचा संबंध नसला तरी, ‘आम्ही बनविलेल्या टिपºया विकत घ्या आणि दांडिया एंजॉय करा’अशी विनवणी ही मुले लोकांना करीत आहेत. पारधी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प घेतलेल्या मतीन भोसले यांच्या मंगरूळ चव्हाळा गावातील ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेत हे चिमुकले हात सद्यस्थितीत टिपºया बनविण्यात व्यस्त झाले आहेत.अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा येथे सन २०१२ पासून ‘प्रश्नचिन्ह’आश्रमशाळा लोकवर्गणीतून चालविली जात आहे. राज्य शासन ‘प्रश्नचिन्ह’ला अनुदान देईल, ही आशा आजही मतीन भोसले यांना आहे. मात्र, राज्यासह अन्य प्रांतातून आश्रमशाळेत आणलेल्या फासे पारधी समाजाच्या मुला-मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत. आश्रमशाळेतील फासे पारधी समाजाची मुले वाममार्गाला लागू नयेत, ही त्यांची तगमग आहे.२१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असून नऊ दिवस अमरावती जिल्ह्यात दांडियाची धूम असते. त्यामुळे हा उत्सव ‘कॅश’ करून पारधी मुलांना रोजगार देण्याची संधी मतीन भोसले यांनी हेरली आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाच हजार टिपºया पारधी मुलांनी तयार केल्या आहेत. टिपºयांसाठी लागणाºया काड्या सातपुडा पर्वत रांगेतील देवकाळी वृक्षांच्या फांद्यापासून बनविल्या जात आहेत. या मुलांना टिपºया तयार करण्याचे प्रशिक्षण मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अजय किंगरे यांनी दिले आहे.शाळा सांभाळून टिपºया बनविण्याचे काम विद्यार्थी करीत आहेत. आश्रमशाळेला अनुदान नसल्याने पारधी मुलांना दोन वेळेचे जेवण कसे देता येईल, याचे नियोजन करण्यासाठी मतीन भोसले यांनी टिपºया बनविण्याचा पर्याय निवडला आहे. दांडियाची एक जोडी ५० रुपयांना विकली जात आहे. रासगरबा खेळा पण टिपºया घेणार असाल तर आमच्याकडून विकत घ्या, अशी भावनिक साद फासेपारधी मुला-मुलींनी घातली आहे.
आम्ही टिपºया बनवल्या, तुम्ही विकत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 3:01 PM
एरवी फक्त भीक मागण्यासाठी पसरणारे हात आणि माथ्यावर ‘चोर’ असल्याचा शिक्का घेऊन उघड्यावर जगणारी पारधी समाजातील ४५० मुले स्वकौशल्याचा वापर करून टिपºया बनवीत आहेत.
ठळक मुद्देफासे पारधी विद्यार्थ्यांची विनवणी सातपुडा पर्वत रांगेतील देवकाळी वृक्षांच्या फांद्यांचा वापर