पालकमंत्री, ग्रामपंचायत इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नांदगाव पेठ : शादलबाबा दर्गा व संगमेश्वर संस्थान विकास तसेच नांदगावपेठ येथील आवश्यक कामे व रस्त्यासाठी पुरेसा निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नांदगावपेठ येथे दिली. स्थानिक नवनिर्मित ग्रामपंचायत भवनचे सोमवारी त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देशमुख, सरपंच कविता डांगे, उपसरपंच मझहर खान, माजी सभापती जयंतराव देशमुख, गोपाळराव धर्माळे, विनोद डांगे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
बॉक्स
राष्ट्रसंतांच्या हस्ते झाले होते मूळ इमारतीचे लोकार्पण
नांदगावपेठेच्या मूळ ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते १९६१ मध्ये झाले. त्याबाबत गौरवपूर्ण उल्लेख करताना पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, राष्ट्रसंतांनी आपल्या विचार व कार्यातून देशाला ग्रामविकासाची दिशा दिली. त्यांनी लोकार्पण केलेली इमारत आज नव्या रुपात उभी राहिल्याचा आनंद आहे. राष्ट्रसंतांचे विचार व कार्य जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत काम करू, असे त्यांनी आश्वासित केले.