पथदर्शक स्वरुपात लागू : संत्रा, मोसंबी, पेरुचा संरक्षित विमागजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगामात कमी पाऊस, पावसातील खंड व सापेक्ष आर्द्रता यापासून फळपिकांना निर्धारित कालावधीत संरक्षण मिळावे, हवामान घटकावर आधारित फळपीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहावे यासाठी हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना २0१४ सुरु ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात संत्रा, मोसंबी व पेरु या मृगबहर पिकांचा समावेश करण्यात आला आहे. मागील वर्षी द्राक्ष, केळी, संत्रा, मोसंबी, चिकू, डाळिंब, पेरु, आंबा व काजू या निवडक फळपिकांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचे प्रायोगिक तत्त्वावर हवामान घटकांपासून संरक्षण देण्यात आले होते. ही योजना राज्यामधील निवडक फळपिकांना त्यांच्या हंगामानुसार टप्प्याटप्प्याने लागू करण्यास शासनाने मंजुरात दिली आहे. योजना मंजूर असलेल्या तालुक्यात महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. या ठिकाणी नोंदलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार निर्देशित विमा कंपन्याद्वारा शेतकर्यांना बँकामार्फ त नुकसान भरपाई परस्पर देण्यात येणार आहे. अमरावती, वर्धा, बुलढाणा, नागपूर, हिंगोली व अहमदनगर जिल्ह्यातील संत्रापिकांच्या मृगबहरासाठी एचडीएफसी या विमा कंपनीद्वारा विमा संरक्षण देण्यात येणार आहे.विविध वित्तीय संस्था व बँका यांच्याकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या तसेच ज्या शेतकर्यांनी अधिसूचित फळपिकासाठी पीक कर्ज र्मयादा मंजूर आहे त्या शेतकर्यांना ही योजना सक्तीची आहे. गैर कर्जदार शेतकर्यांसाठी मात्र ही योजना ऐच्छिक स्वरुपात राहणार आहे.
हवामानावर आधारित पीक विमा योजनेत ‘मृगबहराचा’ समावेश
By admin | Published: June 08, 2014 11:32 PM