हवामान तज्ज्ञांचा अंदाज : ९ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी गारपीटअमरावती : विदर्भ ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती निर्माण झाल्याने बुधवार व गुरुवार पुन्हा विजेच्या गडगडाटासह पाऊसांची शक्यता आहे. अशातच गुरुवारी काही तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भात ३१ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली होती. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशीही विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर ८ ते १० मार्च दरम्यान विदर्भातील काही ठिकाणी गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. आता पुन्हा ८ आणि ९ एप्रिल या दोन दिवसात विजेच्या गडगडाटासह पाऊस व तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.आसाम ते छत्तीसगड कमी दाबाची द्रोणिय स्थिती असून त्यांच्या परिणामाने त्रागेय पश्चिम बंगाल, उत्तर ओरिसा, राजस्थान आणि झारखंड भागात दिड किलोमिटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे येत्या तीन दिवसात कमाल तापमान २ ते ३ डिग्री सेल्सीअसने वाढण्याचे संकेत हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिले आहे. उन्हाळा सुरु झाल्यापासून तापमान हळूहळू वाढत आहे. दरम्यान पाऊस पडल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर तापमान ३९ डिग्री सेल्सीअसपर्यंत पोहचल्याने उन्हाळ्याच्या झळ जाणवू लागली आहे. शनिवारी ३९.८ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद हवामान विभागाने केली असून धुळीचे वादळ आणि पावसाच्या आगमनामुळे पुन्हा तापमान कमी होईल. त्यांनतर उन्हाची तिव्रता अधिक प्रमाणात वाढणार असा अंदाज आहे.
बुधवार, गुरुवारी विजेच्या गडगडाटासह पुन्हा पाऊस !
By admin | Published: April 07, 2015 12:36 AM