संत व्हॅलेंटाईन हे रोमन कॅथलिकपंथीय होते. या अतिशय प्रेमळ संताच्या नावावर व्हॅलेंटाईन डे हा उत्सवच जगभर साजरा करण्यात येतो. मुळात प्रेम हे काय फक्त प्रेयसीवरच केले जात नाही. आपल्या सर्वांची हृदयस्थ व्यक्ती ही आई, वडील, भाऊ, बहीण, आपली चिमुकली मुले किंवा पाळीव प्राणीसुद्धा होते. संशोधनानुसार, प्रेम एक भावना आहे आणि ती व्यक्तीला भावना प्रकट झालीच पाहिजे. म्हणून आपल्याला जी व्यक्ती आवडते किंवा आपले ज्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे, अशा व्यक्तीला आपले हावभाव सांगून मन मोकळे केले पाहिजे. असे संशोधनातून आढळून आले आहे.प्रेमाचा उत्सव म्हटले की, आपली कान टवकारले असतील, यात शंकाच नाही. बहुतांश तरुणांच्या कायम आठवणीत राहणारा उत्सव फेब्रुवारी महिन्यात येतो. त्यातील अतिशय महत्वाचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी "व्हॅलेंटाईन डे" प्रेमाचा उत्सवाचा दिवस आहे. आज पाश्चात्य देशांत प्रेम प्रकट करण्याचे उपक्रम आवर्जून साजरे केले जातात. त्याच ताकदीने आणि उत्साहाने व्हॅलेंटाईन वीक आपल्या देशातही आता साजरा होऊ लागला आहे. त्यानुसार. ७ फेब्रुवारीला रोज डे , ८ फेब्रुवारीला प्रपोज डे, ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे , १२ फेब्रुवारीला किस डे, १३ फेब्रुवारीला हग डे, आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असे आठवडाभर प्रेमयुगुलांसाठी नव्हे, तर विविध लोकांवर प्रेम करण्यासाठी या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. त्यानिमित्त तरुणाईत जय्यत तयारी सुरू झाली आहे.
-----------गुलाब हे प्रेमाचे प्रतीक
व्हॅलेंटाईन वीकचा पहिला मान प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबालाच आहे. त्यामुळे जगभरात रोज डे म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमाच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरुणही आपल्या जीवलगा वर लाल, पिवळ्या गुलाबाची उधळण करतात. व्हॅलेंटाईन या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश आहे. मग ते प्रेम आई वडील वर असो की बहीण भावाचे या उत्सवाला तरुणांई मात्र मोठ्या उत्साहात साजरा करतात.
-----------------