चांदूर बाजार : कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.हा तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे या तालुक्यात आदिवासींची संख्या भरपूर आहे. ग्रामीण स्तरावर कमी वजनाच्या बालकांसाठी व मातेसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागामार्फत, बालविकास सेवा योजनेतून सकस आहार गावोगावी देण्यात येते.ऊंचीनुसार सॅम व मॅममध्ये असणाऱ्या बालकांसाठी त्याच गावात ग्राम बाल विकास केंद्र उघडण्यात आली असून, यात अशा बालकाची संख्या शिरजगाव कसबा, बोरज, जसापूर, देउरवाडा, माधान, कोदोरी, चिंचोली, ब्राह्मणवाडा पाठक, घाटलाडकी, परसोडा, बेलमंडळी, बोराडा, खराळा, बेसखेडा, आसेगाव, राजना, करजगाव, खरपी, तळेगाव मोहना, तुळजापूर गढी, सैदापूर, तोडगाव, बेलज, कुºहा या गावाच्या परिसरामध्ये जास्त दिसून येते.सकस आहाराची चव बदलणे गरजेचेघरची गरीब परिस्थिती व अज्ञानता असल्यामुळे मातेला सकस आहार सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्याचा परिणाम होणाºया बाळावर होऊन मूल कमी वजनाचे जन्माला येतात. शासनासने अनेक योजनांमार्फत अशा मातांना सकस आहार पुरविणे सुरु केला असला तरी यातील कित्येक महिला या सकस आहाराचा उपयोग घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महिलांना आवडेल तसा सकस आहार पुरविल्यास गर्भवती महिला आवडीने खाऊ शकतील.गर्भधारणेपासून सकस आहार महत्त्वाचाजन्मजात बाळांकरिता आईचे दूध हे अमृत असते. त्या दुधामुळेच बाळाला शक्ती प्रधान होत असते. त्यामुळे आईच्या गर्भधारणेपासून त्या महिलेस आवशकतेनुसार सकस आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हाच बाळ सुदृढ जन्माला येऊ शकते.
चांदूर बाजार तालुक्यात ११,५५३ बालके कमी वजनाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:14 PM
कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी शासनासने जिल्ह्यात विविध योजना राबविल्या असतानाही तालुक्यात सद्यस्थितीत तीव्र कमी वजनाचे १४१, मध्यम कमी वजनाचे १०६१ व सर्वसाधारण वजनाचे ११ हजार ५३१ बालके आहेत. यातील ऊंचीनुसार सॅममध्ये ११, तर मॅममध्ये ४६ असे एकूण ५७ बालके कुपोषित आढळून आले आहेत. याचे चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देसॅम व मॅममध्ये ५७ बालके : शासनाच्या विविध योजना असताना कुपोषण थांबता थांबेना