शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

बाजारातून वजनकाटे गायब

By admin | Published: January 14, 2016 12:20 AM

तालुक्यातील आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली असूून वजन मोजण्यासाठी दगड, बटाटे, कांदे यांचा वापर केला जात आहे.

चांदूरबाजार तालुका : इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यातसुद्धा होते लुबाडणूकसुमित हरकुट चांदूरबाजारतालुक्यातील आठवडी बाजारातून आता वजने गायब झाली असूून वजन मोजण्यासाठी दगड, बटाटे, कांदे यांचा वापर केला जात आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असतानाही वजन व मापे विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भाव केला जातो. त्याचवेळी नकळत हातसफाईने फसवणूक केली जाते, हे ग्राहकांच्या लक्षात येत नाही. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभर पैसे कमी झाल्याचे समाधान मिळते. मात्र, त्यातून फसगत होते हे कळत नाही. मागिल अनेक दिवसांपासून आठवडी बाजारात दांडी मारण्याचा प्रकार सुरू आहे. सर्वच आठवडी बाजारात हिच परिस्थीती आहे. तालुक्यात ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, शिरजगाव कसबा, करजगाव, आसेगाव ही मोठी गावे आहेत. येथे आठवडी बाजार भरतो. तालुक्याच्या बाहेरुन सुध्दा किरकोळ व्यापारी दुकान मांडण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथे ३०० ते ४०० दुकाने सुरू असतात. या दुकानदारांना वजन व मापे दर दोन वर्षातून एकदा संबंधीत विभागाकडून प्रमाणित करुन घ्यावी लागतात. मात्र, आठवडी बाजारात व्यापारी वजन व मापे नियमाप्रमाणे प्रमाणित करीत नाहीत. संबंधित वजन व मापे विभागाकडून त्यांची कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता निर्ढावलेले आहेत. परिणामी हे दुकानदार वस्तू मोजण्यासाठी खुलेआम दगड, बटाटे, कांदे यांचा वापर करताना दिसून येतात. अनेक किरकोळ व्यापारी मागिल अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही कमी होते. त्याच वजन व मापांनी वस्तू मोजून ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिल्यास त्या वस्तूचे वजन अनेकदा किलापेक्षा कमीच असते. त्यातच आठवडी बाजारातील काही विक्रेते ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत असतात. त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन तर सोडाच दुसरे पर्यायी वजन किंवा माप नसते. वस्तू मोजताना ते प्रचंड हाथसफाई करतात. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लाऊनही हाथसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो त्या बाजुला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकांच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही हे बघताच तराजुची दांडी वरील बाजुला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो. आठवडी बाजारातील विक्रेते अशा अनेक क्लृप्त्या वापरून वजनात हेराफेरी करतात. अलिकडे तर बाजारात डुप्लिकेट वजन-मापेही दिसून येतात. वजनावर एक किलो असे लिहिलेले असते. प्रत्यक्षात त्यचे वजन ८०० ग्रॅमच असते. बरेचदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक प्रमुख कारण असते. तेव्हा वजनमापे निरीक्षकांनी वजनकाट्यांची तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.