वनोजा बाग/अमरावती : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य ध्वजाचे आज अमरावती येथे स्वागत करण्यात आले. आमदार राेहित पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्याची शेवटची लढाई झालेल्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ६४ मीटर उंचीचा देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यात येणार आहे. त्यापूर्वी देशातील ७४ भक्तिपीठे, संतपीठे व शौर्यपीठांच्या ठिकाणी या ध्वाजाचे प्रातिनिधिक स्वरूपात पूजन करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील संत गाडगेबाबा यांच्या जन्मभूमीत १३ सप्टेंबरला सकाळी ८ ला जामखेड कर्जत येथून निघालेल्या स्वराज्य ध्वज रथ दाखल होऊन संत गाडगेबाबा यांच्या जन्मस्थळी स्वराज्य ध्वजाचे पुजन करण्यात आले. जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हिंदवी स्वराज्याची शेवटची लढाई असलेल्या खेर्डा येथे झाली होती व शत्रूला धूळ चारत मावळ्यांनी खेर्डा येथे भगजा ध्वज फडकवला होता व हिंदवी स्वराज्यची स्थापना ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक केला होता. खेर्डा येथील किल्ल्यातील ध्वज ७४ मीटर, स्तंभाचे वजन १८ टन, आकार ९६ बाय ६४ फूट व ध्वजाचे वजन ९० किलो राहणार आहे. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनिल वऱ्हाडे, तालुकाध्यक्ष सुरेश राऊत, सागर साबळे, किरण साबळे, शिवा काळे, हावरे, नानाजी गवळी, सरपंच गजानन सोळंके, उपसरपंच स्वप्निल साबळे, गाडगेबाबा यांचे पणतू नितीन जाणोरकर, वैभव काकड , सार्थक जानोरकर , प्रवीण जानोरकर, अर्चना काळे, प्रतिभा काटकर, प्रणिता तायडे, गौरव साबळे, मंगेश तायडे, शुभम घाटे, निखिल आसलकर, पुरुषोत्तम बुरघाटे, संचित इसळ, आकाश काकड, गजू वैराळे, स्वराज्य बारब्दे, श्रीकृष्ण डिके आदी उपस्थित होते.