अमरावती : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या शारदानगरस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ते खासगी दौऱ्यावर आले असताना जाजोदिया यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला. भाजपचा आवाज दिल्लीत बुलंद करणारे अहीर शनिवारी दुपारी १.३० वाजता जाजोदिया यांच्या निवासस्थानी आलेत. अहिर यांनी जाजोदिया यांच्याकडून येथील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील उद्योेगक्षेत्रातील संभाव्य संधीबाबत अहीर यांनी यावेळी जाणून घेतले. विहिंप, बजरंग दल, पशूधन बचाव समितीच्या सदस्यांनी अहीर यांच्याशी मुक्त संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, नगरसेवक प्रणय कुळकर्णी, नूतन भुजाडे, राधा कुरील, डॉ. हेमंत मुरके, गोविंद कासट, संदीप वैद्य, संजय तिरथकर, मतीन भोसले यांनी अहीर यांच्याशी संवाद साधला. आ. रवी राणा यांना घरी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची अमरावतीला सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 9:58 PM
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या शारदानगरस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ते खासगी दौऱ्यावर आले असताना जाजोदिया यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला.
ठळक मुद्देनिवेदने स्वीकारली : राजकीय भाष्य टाळले