लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुदेवभक्त व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी महासमाधी स्थळावर बैठक झाली. यात काही तोडगा निघाला नसला तरी काही दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती गुरुदेवभक्तांनी दिली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता, भजने, सुविचार, श्लोक, पोवाडे, भाषणे, लेख, पत्र, ग्रंथ अशा अनेक महत्त्वपूर्ण साहित्यात वारंवार बदल झाल्याचे अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचा आरोप आहे. राष्ट्रसंतांचे साहित्य, वस्तू, प्रचाराचे साहित्य, ग्रामगीता प्रकाशनाचा अधिकार राष्ट्रसंतांनीच श्रीगुरुदेव सेवा मंडळाला दिला आहे. मात्र, अनेक जण आपल्या सोयीनुसार त्यात ढवळाढवळ करून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे अधिकार मंडळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने श्री अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवी खडतकर यांच्या नेतृत्वात गुरुदेवभक्त व श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात पुढील बैठकीत चर्च्चा होणार आहे. या बैठकीला श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, राजाराम बोथे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.यांच्यावर कारवाई होणार काय?संस्थेचे माजी संचालक सुब्बाराव तसेच रामदेवबाबा, आसाराम बापू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात बदल केले. आता या लोकांवर संस्था कारवाई करणार की खऱ्या प्रचारकांना वेठीस धरणार, असा प्रश्न गुरुदेवभक्त करीत आहेत.माझ्या समाधी परिसरात कुठेही मूर्तिपूजा नको, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीच स्पष्ट केले होते. परंतु, तेथे कित्येक वर्षांपासून हनुमानाची मूर्ती आहे. निवेदन देऊनही या मूर्तीचे स्थलांतर नाही. यावरसुद्धा चर्चा होईल.- रवि खडतकर,संचालक, भूवैकुंठ अध्यात्म गुरुकुल, मोझरीराष्ट्रसंतांच्या साहित्य प्रकाशनाचे सर्व अधिकार अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाला आहेत. जो कोणी साहित्याची मोडतोड करेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात आमच्याशी संपर्क करावा.- जनार्दनपंत बोथे,सरचिटणीस, अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ
राष्ट्रसंतांच्या साहित्याचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 10:10 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुदेवभक्त व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्यात मंगळवारी महासमाधी स्थळावर बैठक झाली.
ठळक मुद्देगुरुदेवभक्त, पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा : मंगळवारी तोडगा नाही, पुन्हा बैठक