संदीप मानकर/अमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ४२.५३ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. १७ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या पाणीसाठ्याची नोंद जलसंपदा विभागाने घेतली. चार दिवसांपासून सार्वत्रिक दमदार पाऊस जरी थांबला असला तरी २१ आॅगस्टपर्यंत पूर्व विदर्भ वगळता उर्वरित विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात अनेक ठिकाणी हलका व मध्यम पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची आशा व्यक्त होत आहे.
सद्यस्थिती पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ४१.१५ टक्के पाणीसाठा आहे. २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी ५५.२० टक्के पाणीसाठा आहे. ४६९ लघू प्रकल्पांत ३६.४८ टक्के पाणीसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३९.७८ टक्के, अरुणावती १२.२४ टक्के, बेंबळा सर्वाधिक ७५.१६ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८.०४ टक्के, वान ७३.६५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात १९.६९ टक्के, पेनटाकळी ६८.०७ टक्के, खडकपूर्णा शून्य टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्प भरल्यानंतर परतीच्या पावसाने मोठे प्रकल्प भरत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्याकारणाने आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.
२४ मध्यम प्रकल्पांची स्थितीअमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतसुद्धा चांगला पाणीसाठा साचला असून, शहानूर मध्यम प्रकल्पात ८७.२५ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ८९.१६ टक्के, पूर्णा ८३.३५ टक्के, सपन सर्वाधिक ८६.७४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस मध्यम प्रकल्पात ८७.४९ टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ४६.२४ टक्के, वाघाडी ४०.५५ टक्के, बोरगाव ६८.६८ टक्के, नवरगाव १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा १३.३८ टक्के, मोर्णा २०.३८ टक्के, उमा ५.४८ टक्के, घुगंशी बॅरेज शून्य टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ७.९९ टक्के, सोनल ११.५२ टक्के, एकबुर्जी प्रकल्पात ४०.५२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात ७५.६९ टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी शून्य टक्के , मन ४५.४८ टक्के, तोरणा ६२.९९ टक्के, तर उतावळी प्रकल्पात ४०.९३ टक्के पाणीसाठा आहे.
विदर्भात पावसाची शक्यताउत्तर बंगालच्या उपसागरावर ७.६ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, ते दक्षिणेकडे झुकलेले आहेत. त्यांच्या प्रभावामुळे रविवारी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली. त्यामुळे विदर्भात पावसाच्या प्रमाणात किंचित वाढ होईल.