अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : रिमझिम पावसात ओलेचिंब होण्याचा अवर्णनीय आनंद प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. हा आनंद मिळविण्यासाठी अमरावतीकर मेळघाट गाठतात. मात्र, हीच स्वर्गीय अनुभूती देण्यासाठी पोहरा जंगल सज्ज झाला आहे. मेळघाटपाठोपाठ या जंगलालाही पावसाळी पर्यटनासाठी पसंती मिळू लागली आहे.मेळघाटात जाणारे घाटवळणाचे रस्ते, हिरवीगार वनराई न्याहाळत, तुषार अंगावर झेलत ओलेचिंब होणे, हा आनंदच अवर्णनीय. त्यासाठी मेळघाट गाठणे सर्वांनाच शक्य नसल्याने ती बूज पोहरा-चिरोडी जंगलाने भरून काढली आहे. त्यामुळे प्रेमीयुगुलांचे थवे या जंगलातील आडवाटांवर मुक्त विहार करताना आढळतात.प्रेमाच्या रेशमी बंधातील युगुलांसाठी हा परिसर नवीन नाही. पोहरा-चिरोडी जंगलातील हिरव्यागर्द पर्णराशीच्या छायेत युगुलांनी विसावा घेतला आहे. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही कायम आहे. कधी-कधी त्याच पर्णराशींना प्रेमराशी म्हणावे की काय, असा विचार मनात डोकावून जातो.आज हा परिसर वरुणराजाच्या कृपेने सशक्त झाला आहे. वरुणराजाच्या सहस्त्र करांनी पोहरा-चिरोडी जंगलाची कूस ओलीचिंब करून टाकली. येथील उन्हाने काळी करपलेली ही भूमी हिरवीगार झाली आहे.
रिमझिम पावसातील ते ओलेचिंब होणे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:02 PM
रिमझिम पावसात ओलेचिंब होण्याचा अवर्णनीय आनंद प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. हा आनंद मिळविण्यासाठी अमरावतीकर मेळघाट गाठतात. मात्र, हीच स्वर्गीय अनुभूती देण्यासाठी पोहरा जंगल सज्ज झाला आहे. मेळघाटपाठोपाठ या जंगलालाही पावसाळी पर्यटनासाठी पसंती मिळू लागली आहे.
ठळक मुद्देमेळघाटपाठोपाठ पसंती : पोहरा जंगलात पावसाळी पर्यटनाची स्वर्गीय अनुभूती