नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.परतवाडा-खंडवा या मध्यप्रदेशात जाणाऱ्या आंतरराज्यीय महामार्गावर सेमाडोहपासून सहा कि.मी अंतरावर मोतीनाला पूल आहे. तो संपूर्ण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही त्यांचीच आहे. अनेक ब्रिटिशकालीन पूल या रस्त्यावर आहेत. मात्र, त्यातील मोतीनालापूल वाहनधारकांच्या जीवावर उठला आहे. शनिवारी दुचाकीने जाणाºया शिक्षकांसह दोघांचा बळी याच पुलाने घेतला.तात्काळ उपाययोजनेची गरजत्यावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे, हे न उलगडणारे कोडेच ठरले आहे. यासंदर्भात 'लोकमत'ने पूर्वीच्या अपघातांचे सचित्र वृत्त प्रकाशित केले आहे, हे विशेष.या करा तत्काळ उपाययोजनामोतीनाला पूल हा अरुंद आहे. त्यावर बांधण्यात येणारे सुरक्षा कठडे वळणावर असल्यामुळे ट्रक व जड वाहनांनी तुटून जातात. त्यामुळे दुचाकीस्वारासाठी हा पूल जीवघेणा ठरला आहे. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन २५ फूट खाली कोसळतात. त्यात अपघात होऊन गंभीर जखमी व जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे तेथे सुरक्षा फलक आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे नूतनीकरण व रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सतत अपघात होणाºया या पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने हा संशोधनाचा विषय ठरत आहे.मोतीनाला पुलावर अनेकदा अपघात घडले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाणार आहे.- आकाश शिंदे,ठाणेदार, चिखलदरामोतीनाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. अपघात पाहता पुलावर कठडे, रस्त्यावर गतिरोधक व फलक तत्काळ लावण्यात येईल.- नितीन देशमुख,उपविभागीय अभियंता, सा.बां.
मोतीनाल्यावर किती बळी हवे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:18 PM
दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे.
ठळक मुद्दे‘बी अँड सी’ला सवाल : ३० हून अधिक अपघात; ५ जणांचा बळी