* कोणत्या भाजीपाल्याला किलोचा काय भाव:-
भाजीपाला शेतकरी. ग्राहक
वांगी . तीन रुपये ४० रुपये
टोमॅटो. सात रुपये. २० रुपये
भेंडी. पाच रुपये. ४० रुपये
चवळी. सात रुपये. ४० रुपये
पालक. पाच रुपये. ४० रुपये
मेथी. वीस रुपये. ६० रुपये
हिरवी मिरची. पंधरा रुपये. ६० रुपये
पत्ताकोबी. आठ रुपये. ३५ रुपये
फुल कोबी. सात रुपये. ४० रुपये
दोडके. सात रुपये. ४० रुपये
कोथिंबीर. आठ रुपये. ८० रुपये
* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
कोट
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले असून उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. हिरवी वांगी केवळ दोन ते तीन रुपये किलोप्रमाणे मोजून घ्यावी लागत आहेत. यात तोडाईचा खर्च, शेतापासून रोडपर्यंत वाहून नेण्याचा खर्च, कट्टे आणि बारदाना शेतकऱ्यालाच घ्यावा लागत आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण शेतकऱ्याला खिशातून खर्च करावा लागत आहे. जवलापूर, पथरोट परिसरात जवळपास पाचशे एकर हिरव्या वांगीची लागवड आहे. भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी वांग्याची तोडाई बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच ही वांगी सडत आहेत.
- आसिफ मोहम्मद, शेतकरी, पथ्रोट
कोट
स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला बाजारपेठेत विकताना त्याचे भाव अत्यल्प असते. २० किलो भेंडीचे पोते २० रुपयात बाजारात मागितले जाते. ती भेंडी तोडायला २० च्या कितीतरी पट अधिक खर्च येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही यातून हाती लागत नाही. हिरवी मिरची १५ रुपये किलोनी मागितली जाते. १५ किलो मिरची तोडायला दोनशे रुपये खर्ची पडतात. काटा हमाली आणि कमिशन हे वेगळेच. कोथिंबीर, पालक, चवळी, दोडके यासह अन्य भाजीपाल्यांचीही तीच गत आहे.
- सुनील कडू, शेतकरी, जवळापूर
* ग्राहकांना परवडेना
कोट
शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांना माफक दरात भाजीपाला उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. वीस रुपये पावाप्रमाणे कोथिंबीर घ्यावी लागते. ४० रुपये किलोच्या खाली कुठलीही भाजी ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे या महागड्या भाज्या हातमजुरी करणाऱ्या ग्राहकांना परवडणाऱ्या नाहीत.
- संजय वानखडे, ग्राहक, कांडली
कोट
बाजारात कडाडलेले भाज्यांचे भाव ग्राहकांना परवडणारे नाहीत. आलू वगळता कुठलाही भाजीपाला 20 रुपये किलोत ग्राहकांना मिळत नाही. बाजारात कांदा 30 ते 40 रुपये किलोच्या खाली नाही. हिरवा भाजीपाला ग्राहकांना 40 ते 60 रुपये किलो प्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. सामान्य ग्राहकांच्या हा भाजीपाला आवाक्याबाहेर आहे.
- विनोद इंगोले, ग्राहक परतवाडा
* भावात एवढा फरक का
कोट
मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या प्रमाणात खरेदी नाही. अंगावर दिलेल्या भाजीपाल्याची वेळेत वसुली नाही. एक किंवा दीड दिवसानंतर शिळा भाजीपाला कुणी विकत घेत नाही. तो टाकून द्यावा लागतो. यातच बाहेरून येणारा भाजीपाला आहे. दरम्यान पावसामुळे भाजीपाल्याची गुणवत्ताही कमी अधिक होते. यामुळे शेतकरी ते ग्राहक यात भावात फरक दिसून येतो.
- दीपक चंदेल, व्यापारी अचलपूर