भाजीपाला शेतकरी. ग्राहक
वांगी . तीन रुपये चाळीस रुपये
टोमॅटो. सात रुपये. वीस रुपये
भेंडी. पाच रुपये. चाळीस रुपये
चवळी. सात रुपये. चाळीस रुपये
पालक. पाच रुपये. चाळीस रुपये
मेथी. वीस रुपये. साठ रुपये
हिरवी मिरची. पंधरा रुपये. साठ रुपये
पत्ताकोबी. आठ रुपये. 35 रुपये
फुल कोबी. सात रुपये. चाळीस रुपये
दोडके. सात रुपये. चाळीस रुपये
कोथिंबीर. आठ रुपये. 80 रुपये
* शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
कोट
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचे भाव कमालीचे गडगडले असून, उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. हिरवी वांगी केवळ दोन ते तीन रुपये किलोप्रमाणे मोजून घ्यावी लागत आहेत. यात तोडाईचा खर्च, शेतापासून रोडपर्यंत वाहून नेण्याचा खर्च, कट्टे आणि बारदाना शेतकऱ्यालाच घ्यावा लागत आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण शेतकऱ्याला खिशातून खर्च करावा लागत आहे. जवलापूर, पथरोट परिसरात जवळपास पाचशे एकर हिरव्या वांगीची लागवड आहे. भाव गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी वांग्याची तोडाई बंद केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतातच ही वांगी सडत आहेत.
- आसिफ मोहम्मद, शेतकरी, पथ्रोट