शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बेकरी उत्पादनाची गुणवत्ता काय ?

By admin | Published: October 03, 2016 12:07 AM

मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला.

पालकमंत्री गप्प का ? : एफडीए केव्हा घेणार नमुने ?अमरावती : मनभरी उत्पादनाच्या चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढल्यामुळे मनभरीचा कारभार चव्हाट्यावर आला. चिवड्यात विषारी प्राणी आढळणाऱ्या मनभरीच्या बेकरी उत्पादनाची गुणवत्ता किती, असा प्रश्न आता ग्राहकांना पडला आहे. मनभरीची नाना बेकरी उत्पादने बाजारात आहेत. या उत्पादनादरम्यान अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमांनुसार पाळाव्या लागणाऱ्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते की नाही, हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.मनभरी चिवड्याच्या पाकिटात अख्खी पाल आढळून आल्यानंतर मनभरीला अन्न व औषधी प्रशासनाने आजपर्यंतही अधिकृतरीत्या नोटीस बजावलेली नाही. एफडीएने मनभरीच्या उत्पादन केंद्रात भेट दिली. तपासणी केली. त्यादरम्यान रजिस्टरमध्ये त्यांनी नोंद केली. त्यात सर्व माल परत बोलवावा, असा शेरा लिहिला. त्यानंतर एफडीएने कारवाईचा शिकंजा हवा तसा आवळलेला नाही. बेकरीची मोठ्या प्रमाणात उत्पादने असताना आणि ती व्यापकरीत्या विकली जात असताना, एकाच ब्रँडच्या या अन्नप्रकाराचे नमुनेही एफडीएने घ्यायला हवे होते. सामान्य ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब उपयोगी ठरली असती. चिवड्याचे उत्पादन जी मंडळी करतात, तीच मंडळी बेकरी प्रोडक्टचेही निर्माते असल्यामुळे सदोषतेच्या शक्यतेची सुई ब्रेड, टोस्ट आदी अन्नप्रकारांकडेही वळतेच. आपण काय खातो, याबाबत सामान्यजन आता कमालीचे सतर्क झाले आहेत. मनभरीच्या सर्वच अन्नपदार्थांचे नमुने एफडीएने घ्यावे. रन्डमली ते घेत रहावे, अशी मागणी नागरिकांनी 'लोकमत'ला पाठविलेल्या पत्रांतून केली आहे. अमरावती जिल्ह्यात एफडीएचे अस्तित्त्व आहे की नाही, स्थिती इतकी खालावलेली आहे. आंब्यांमध्ये कार्बाईड, केळीत इथेनॉल, सफरचंदांना मेण, रघुवीरच्या कचोरीत अळी, शांती रिफ्रेशमेंटच्या कचोरीत गुटख्याचे पाऊच आणि हे सारे कमी झाले म्हणून की काय मनभरीच्या चिवड्यात चक्क पाल, असे चित्र शहरातील अन्नविषयक उत्पादनांच्या विक्रीचे आहे. सामान्यंच्या खाण्यात जहर कालवले जात असतानाही शासन शांत आहे. मनभरी, रघुवीरसारख्या ब्रँडवर जिल्ह्याचे पालकमंत्री कठोर कारवाई करतील काय, असा प्रश्न अमरावतीकरांचा आहे. (प्रतिनिधी)