शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

‘त्या’ केंद्राध्यक्षांवर ‘आरओ’ मेहरबान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:25 PM

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली.

ठळक मुद्दे३२ सीयूचे प्रकरण : मतदान प्रक्रियेनंतरही ईव्हीएमचे बटन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर ३२ केंद्राध्यक्षांनी र्इ$व्हीएमचे ‘क्लोज बटन’ सुरूच ठेवल्याने मतदान यंत्र सुरूच राहिले. त्यामुळे आयोगाने आदर्श असे मानांकन दिलेल्या अमरावती लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान काही काळ खोळंबा निर्माण झाला व आकडेवारीतही विसंगती आली. तीन वेळा प्रशिक्षण झाल्यानंतरही निष्काळजीपणा करणाऱ्या मतदान केंद्राध्यक्षांवर निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) अद्याप मेहरबान का, असा मतदारांचा सवाल आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व कर्मचाऱ्यांना तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी सहा विधानसभा मतदारसंघांतील दोन हजार मतदान केंद्रांवर मतदान झाले. सर्व ईव्हीएम अमरावती येथील नेमाणी गोडाऊनमधील स्ट्राँग रूममध्ये त्याच रात्री जमा करण्यात आल्यात व स्ट्राँग रूम सील करण्यात आल्यात. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी ७ वाजता स्ट्राँग रूम उघडण्यात येऊन सकाळी ८ वाजता टपाली व साडेआठ वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली. अमरावती, तिवसा व अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ३२ केंद्रांवरील ३२ ईव्हीएमचे कंट्रोल युनिट (सीयू) हे सुरूच असल्याचे मतमोजणी कर्मचाºयांना यावेळी आढळून आले. वास्तविक, मतदान झाल्यावर क्लोज बटन दाबून युनीट सील करावे लागते. त्यामुळे या सर्व मशीनची मतमोजणी थांबविण्यात आली व आयोगाचे मुख्य निरीक्षक दिनेशकुमार यांच्या परवानगीने संबंधित विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी आटोपल्यानंतर बटन बंद करून मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी खोळंबली. तीन प्रशिक्षणानंतर जर राष्ट्रीय कर्तव्यात चूक होत असेल, तर अशा कर्मचाºयाविरुद्ध आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.फेरीनिहाय संख्येतदेखील विसंगतीआयोगाने अमरावती येथील मतमोजणी केंद्र आदर्श ठरविले होते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत खोळंबा व त्यामुळे सुविधा पोर्टल, आरओंद्वारे ध्वनिक्षेपकावरून जाहीर फेरीचे आकडे व माध्यम कक्षात देण्यात आलेली फेरीनिहाय शीट यामध्ये तफावत दिसून आली. हा घोळ शेवटपर्यत सुरू होता. सूत्रांच्या माहितीनुसार, ३२ ईव्हीएमच्या आकडेवारीमुळेच हा घोळ झाला व आदर्श मतमोजनी केंद्रात विसंगती दिसून आली.सर्व ३२ मतदान केंद्राध्यक्षांना बोलावून चूक कशी झाली, याची कारणमीमांसा करणार आहोत. त्यानंतर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी याबाबतचा निर्णय घेतील.- शरद पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी