शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

विभागीय आयुक्त घेतील का दखल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:21 AM

‘ड्राय झोन’ असलेल्या वरूड तालुक्यात दिवसाढवळ्या तीन हजारांवर बोअर खोदून भूगर्भाची चाळण केली जात असताना महसूल यंत्रणा धृतराष्ट्र बनली आहे. तालुक्यात प्रतिबोअर ४० हजारांची लाच घेऊन बेकायदा बोअर केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी महसूलच्या पाठीशी : आमच्या पोटावर का मारता? शेतकऱ्यांचा उद्वेग

संजय खासबागे ।लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : ‘ड्राय झोन’ असलेल्या वरूड तालुक्यात दिवसाढवळ्या तीन हजारांवर बोअर खोदून भूगर्भाची चाळण केली जात असताना महसूल यंत्रणा धृतराष्ट्र बनली आहे. तालुक्यात प्रतिबोअर ४० हजारांची लाच घेऊन बेकायदा बोअर केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडले. दलाल आणि अधिकाऱ्यांकडून नाडवल्या गेलेल्या शेतकºयांच्यावतीने चौकशीची मागणी करण्यात आली. मात्र, महसूलचे सर्वेसर्वा असलेल्या जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 'अळीमिळी गुपचिळी'ची भूमिका घेतली. आता जिल्हाधिकाऱ्यांचे बॉस असलेले विभागीय आयुक्त बेकायदा बोअरच्या ‘ग्राऊंड लेव्हल’ कहाणीची दखल घेतील का, असा तालुक्यातील पिचलेल्या शेतकºयांचा सवाल आहे.संपूर्ण जिल्हा कोरड्या दुष्काळात होरपळत असताना वरूड तालुक्यात लाच घेऊन बोअर करवून देण्याचे सत्र थांबलेले नाही. तालुक्यात १२०० फुटांवरही पाणी लागेनासे झाले आहे. २८ पेक्षा अधिक गावांत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. १० हजार हेक्टर संत्राबागांवर सिंचनाअभावी कुऱ्हाड चालविण्याची वेळ आली. या संकटातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी खर्च करून योजना तयार केल्या जात आहेत. मात्र, ज्या अधिकाऱ्यांवर योजनांची अंमलबजावणी करण्याची धुरा आहे, त्यांच्यापैकी काही बिनधास्तपणे भूमीचे उदर पोखरण्यास परवानगी देत आहेत. महसूल यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय साधा सात-बारा निघत नसेल, तर तीन-चार लाख खर्च करून ड्राय झोनमध्ये बोअर करण्याची कुणाची बिशाद?बेकायदा बोअर शोधणारे पथक बेपत्ता झाले. कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना बोअर दिसत नाही. ड्राय झोनमधील अवैध बोअरची चौकशी करून जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाºयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा आसूड ओढावा, अशी अपेक्षा असताना या यंत्रणेला त्यांनी पाठीशी घातले. आता विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनीच पुढाकार घेऊन महसूल यंत्रणेची कानटोचणी करावी आणि ड्राय झोनमध्ये कमविते कोण, हे शोधण्यासाठी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी संत्राउत्पादक शेतकºयांची आग्रही मागणी आहे.उपविभागीय कार्यालयात दलालांचा राबतावरूड व तालुक्यातील मोठ्या गावांमधील चौकांमध्ये बोअर मशीन आणि दलाल नेहमीच दिसून येतात. त्यांचे अधिकाºयांशी साटेलोटे असल्याने आणि अधिकाऱ्यांच्या नावे घेतलेली लाचेची रक्कम संबंधितांपर्यंत पोहोचून देण्यासाठी दलालांचा उपविभागीय कार्यालयात नेहमीच राबता असतो. हे वास्तव 'लोकमत'ने वृत्त मालिकेतून लोकदरबारात मांडले. फ्लशिंगच्या नावावर नवी बोअर कशी खोदली जाते, जलसंवर्धन कसे कागदोपत्री आहे, महसूल विभागाने केवळ १० मशिनीवर केलेली कारवाई, ३० बोअर मशीनद्वारे तालुक्यातील भूगर्भाची सुरू असलेली चाळण या विविध विषयांवर 'लोकमत'ने कटाक्ष रोखला.