रोशन कडू ।आॅनलाईन लोकमततिवसा : यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च निघणार की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकºयांच्या कोट्यवधींची तूर मातीमोल दराने व्यापाºयांकडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे.यंदाच्या तुरीच्या हंगामात तिवसा तालुक्यात ५ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तुरीचा पेरा होता. शेतकºयांच्या तुरी बाजारात विक्रीसाठी आलेल्या असतानाही शासनाकडून शासकीय तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाही. नाइलाजाने शेतकºयांना खासगी व्यापाºयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. हमीभावपेक्षा ९०० रुपये प्रतिक्विंटल कमी भावाने तुरीची विक्री करावी लागत आहे. शेतकºयांना बसणारा आर्थिक फटका रोखण्यासाठी तत्काळ शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.तालुक्यात मागील आठ दिवसांपासून तुरीची काढणी सुरू झाली अहे. मात्र, हमीभाव ५४५० असताना खासगी व्यापाºयांकडून केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे. मागील वर्षीच्या गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तत्काळ केंद्र सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.९०० रुपयांपेक्षा अधिक फरकाने खरेदीतालुक्यातील मोठ्या प्रमाणावर तूर पिकाची लागवड झालेली होती. तुरीची काढणी मागील आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. हमीभाव साडेपाच हजार असताना खासगी व्यापाºयांकडून साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होत आहे.दवाळामुळे तुरीचे संपूर्ण पीक वाळलेटाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकºयांचे तुरीचे पीक दवाळामुळे वाळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन आठवड्यांपासून थंडीचा प्रकोप सुरू असल्याने अनेक शेतकºयांच्या शेतातील तूर अवेळी वाळली. अशा पिकांचे पंचनामे करून आर्र्थिक मदतीची मागणी होत आहे. तालुक्यातील रामा, अबितपूर येथील शेतकरी श्रीनिवास हरिभाऊ काळे यांच्यासह अंबादास काळे, अनसूयाबाई काळे, प्रकाश चांदूरकर, राजेश बंड, मोहन तेलखडे, विनायक जुनघरे, बाळासाहेब भोंडे, अशोक भोडेसह परिसरातील अन्य शेतकºयांचे तूर पिकावर दव गेल्याने हातातोंडाशी आलेले पीक सुकले आहे. या नुकसानामुळे हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाच्या संबंधित विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
तूर बेभाव, नाफेडची खरेदी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:16 PM
यंदाच्या हंगामातील नवीन तूर आता बाजारात दाखल होत आहे. ५ हजार ४५० रुपये आधारभूत किंमत असताना व्यापारी कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत.
ठळक मुद्देहंगामाला सुरुवात : शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी