लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांना प्रमाणपत्रदेखील मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित रहावे लागत असल्याचे वास्तव आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई याला कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, ते आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभागाच्यावतीने हे अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जवळपास ११ केंद्रावर हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेले आहेत. यामध्ये त्यांना टेक्सटाईल वेव्हींग, हाऊस किपिंग, रिटेल सेल्स असोसिएट, कॅशीअर, डीटीपी, टॅली, फूड अँड बेव्हरेज, सॉईल टेस्टींग आदी अभ्यासक्रम शिकविण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचमध्ये जवळपास ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. परीक्षा मात्र अद्यापही घेण्यात आलेल्या नाही. विद्यापीठातील एकूणच समन्वयाच्या अभावाने ही परीक्षा प्रलंबित राहली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना रोजगारापासून देखील वंचित रहावे लागत असल्याची स्थिती आहे.निविदा आटोपली, परीक्षा केव्हा ?आजीवन अध्ययन विभागाने प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. त्यामध्ये एसएमबी सोल्युशन्स प्रा.लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे. २२३ रुपये दराने ही कंपनी परीक्षेचे संपूर्ण काम करणार आहे. मात्र निविदा प्रक्रिया आटोपल्यानंतरदेखील परीक्षा प्रक्रिया मात्र सुरू झालेली नाही. या विषयाच्या मंजुरीसंदर्भात २७ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली तातडीची व्यवस्थापन परिषदेची सभादेखील स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात होत असलेली दिरंगाई विद्यार्थ्यांच्या नुकसानीला कारणीभूत ठरत आहे.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम परीक्षा केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:18 PM
विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होतील, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
ठळक मुद्देविद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई : विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप