शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला लगाम केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल्या आहेत. हा सर्व प्रकार दसरा मैदान मार्गावरील रवि नगर चौकात सर्वाधिक पहायला मिळत आहे.शहरात वाहनांची वर्दळ ...

ठळक मुद्देवयोवृद्ध, महिला वैतागल्या : पालकांनो, मुलांना आवरा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हसत-खेळत गप्पा करत वाहनाच्या वर्दळीतून मार्ग काढणाऱ्या शाळकरी मुलांच्या बेभान वाहतुकीला कोण आवरणार, असा प्रश्न सध्या शहरात निर्माण झाला आहे. या बालवयातील मुलांच्या भरधाव वाहनांना पाहून वयोवृद्ध किंवा महिला अक्षरशा वैतागल्या आहेत. हा सर्व प्रकार दसरा मैदान मार्गावरील रवि नगर चौकात सर्वाधिक पहायला मिळत आहे.शहरात वाहनांची वर्दळ बघता कधी अपघात घडेल, हे सांगता येत नाही. 'नजर हटी दुर्घटना घटी, अशीच स्थिती शहराची आहे. अशा स्थितीत शाळकरी मुलांची बेभान वाहतूक अपघाताला आमंत्रण देत आहे. या मुलांकडे परवाना नसतानाही पालकवर्ग त्यांच्या हाती वाहन देत आहे. मात्र, ही मुले शाळेत जाताना व घरी परतताना वाहने व्यवस्थित चालवितात का, हे पाहण्याची तसदीही पालक घेत नाहीत. एकाच दुचाकीवर तिब्बल सिट भरधाव वाहन चालविण्यातही हे शाळकरी मुले पटाईत आहेत. या मुलांना अपघात घडण्याची थोडीही भीती उरली नसल्याचे त्यांच्या चेहºयावरून दिसून येते. वाहनांची शांततेत वर्दळ सुरू असताना अचानक एक दुचाकी भरधाव वेगाने जाते आणि अन्य वाहनांना कट मारत पुढे जात असल्याचे किस्से दररोज शहरात पाहायला मिळत आहे. मात्र, कट मारून पुढे जाणाऱ्या या शाळकरी मुलांना मागील वाहनाधारक किती धाबरला किंवा तो खाली पडला का, हे पाहण्याससुद्धा फुरसत नसते. वाहनांना कट मारल्यानंतरही जोरजोºयात हसत शाळकरी मुले भरधाव निघून जातात. दररोज घडणारे हे प्रकार अनेकांच्या निदर्शनास येतात. अनेक वाहनचालक मुलांना हटकतातसुद्धा. मात्र, त्यांची क्षुल्लकशी दखलसुद्धा हे शाळकरी मुले घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या शाळकरी मुलांची बेभान वाहतूक एखादी मोठ्या घटनेला आमंत्रण देऊ शकते. त्यांना वेळेव्त लगाम लावणे आता गरजेचे झाले आहे.दसरा मैदान मार्गावर वृद्ध कोसळलाएक वृद्ध मंगळवारी सायंकाळी दसरा मैदान ते रविनगर मार्गावरून दुचाकी घेऊन हळूहळू जात होते. अचानक भरधाव तिब्बल सिट बसलेले काही शाळकरी मुले त्या वृद्धाच्या दुचाकीला कट मारून पुढे निघाले. अचानक घडलेला हा प्रकार पाहून त्या वृद्धाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते खाली कोसळले. मात्र, भरधाव पुढे गेलेल्या त्या शाळकरी मुलांना ते वृद्ध खाली पडल्याचे काही देण-घेण नसल्याचे दिसून आले. असे प्रकार दररोज शहरात घडत आहेत.पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. ती अपघाताला आमंत्रण देणारी ठरू शकते. त्याच्या वाहतुकीस बे्रक लावण्याचे प्रयत्न करू. त्यांच्या पालकांना बोलावून समज देण्यात येईल.- अर्जुन ठोसरे,पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा