असाइनमेंट
जिल्ह्यात २९ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना अनुदान; २० प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षांत ५३ मृत्यू
अमरावती : पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षभरापासून सानुग्रह अनुदान मिळाले नाही, तर शासनाकडे या बाबीसाठी एकूण १५ लाख रुपये पडून आहेत. दोन वर्षांत ५३ विद्यार्थी अपघातात दगावले असून, यातील चार प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केली आहेत.
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातात विद्यार्थ्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. शरीराचा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार, तर दाेन अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये अनुदान देिले जाते. अनुदान मंजूर समितीेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. समितीमार्फत शासन निकषांच्या आधारे राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजनेचे अनुदान मंजूर केले जाते. गतवर्षी २९, तरयंदा २० विद्यार्थ्यांना अपघातात मृत्यू ओढवला. सर्वाधिक मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाले आहेत.
----------------------
५३ विद्यार्थ्यांचा दोन वर्षात मृत्यू
२९ सानुग्रह अनुदान मंजूर झालेली प्रकरणे
------------------
कोट
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले. आतापर्यंत २९ कुटुंबांना अनुदान मिळाले आहे. यंदा २० प्रकरणे मंजूर करून अनुदानासाठी शासनाकडे पाठविली आहेत. ही रक्कम येताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना दिली जाईल.
- एस.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), अमरावती.
--------------------
कोट
मुलाचा विजेच्या धक्क्याने १७ एप्रिल २०१९ रोजी मृत्यू झाला. पाेलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कागदपत्रे जमा केली. ७५ हजार रुपये सानुग्रह रक्कम मिळाली आहे.
- सागर शेळके, पालक.
----------------------
मृत्यूचा पोलीस अहवाल प्राप्त, अनुदानाची प्रतीक्षा
जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी अपघातात मृत्यू झाले. मृत्यूच्या ठोस कारणांचा पोलीस अहवाल प्राप्त झाला. समितीने ४९ प्रकरणे मंजूर केली. केवळ चार प्रकरणे नामंजूर केली आहेत. शिक्षण विभागाने ही चारही प्रकरणे पुनश्च निर्णयार्थ पाठविली.
-----------------------
मृत्यूचे कारण काय?
पाण्यात बुडून- १४
सर्पदंश- ५
अपघाती मृत्यू- १९
चक्कर येऊन- २
अन्य कारणांमुळे- १३
-------------------------