-------------------
बडनेरा मार्गावर डांबरीकरण पूर्णत्वास
अमरावती : बडनेरा मार्गावर सातुर्णा, गोपालनगर भागात डांबरीकरणाची कामे पूर्णत्वास आली आहेत. या मार्गावर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. हे खड्डे अपघातास कारणीभूत ठरणारे होते. तथापि, डांबरीकरणामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
-----------------------
माता खिडकी ते भातकुली मार्ग उखडला
अमरावती: स्थानिक माता खिडकी ते भातकुली मार्गावर खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. या मार्गावरून ग्रामीण भागात वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मात्र, खड्ड्यांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
-----------------------
वडाळीत वनजमिनीवर वीटभटट्या
अमरावती : स्थानिक आशियाना क्लब ते वडाळी या मार्गावर वनजमिनीवर वीटभट्ट्यांचे अतिक्रमण वाढले आहे. महसूल विभागाच्या ‘आशीर्वादा’ने हा सर्व प्रकार सुरू आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने वनविभाग हतबल झाला आहे. बिच्छुटेकडी भागात वीटभट्ट्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे.
------------------------
गाडगेनगरात फुटपाथवर व्यवसाय
अमरावती : स्थानिक पंचवटी चौक ते कठोरा नाका या दरम्यान फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. किरकोळ व्यावसायिकांनी फुटपाथवर कब्जा केला आहे. महापालिका प्रशासनाकडून थातूरमातूर कारवाई झाल्यानंतर स्थिती ‘जैसे थे’ होणे हा नित्याचाच भाग झाला आहे.