शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केव्हा?, राज्यासह पंजाबच्या शेतकरी मिशनची नीती आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 5:31 PM

- गजानन मोहोडअमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील शेतकरी स्वालंबन मिशन व पंजाबचे शेतकरी मिशनद्वारा केंद्राच्या नीती आयोगाकडे मागणी करण्यात येऊन एकात्मिक व्यवस्थापनासाठी १० शिफारशी ...

- गजानन मोहोड

अमरावती : संसदेत २००८ मध्ये कीटकनाशक व्यवस्थापन कायद्याला विरोध झाल्यामुळेच कंपण्याचे फावल्याने राज्यासह देशात कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे शेतक-यासह शेतमजुरांचे हजारो बळी जात आहे. त्यामुळे हा कायदा अस्तिस्वात आणून प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्यातील शेतकरी स्वालंबन मिशन व पंजाबचे शेतकरी मिशनद्वारा केंद्राच्या नीती आयोगाकडे मागणी करण्यात येऊन एकात्मिक व्यवस्थापनासाठी १० शिफारशी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे.बहुराष्ट्रीय कंपण्यांच्या दबावात कीटकनाशकांसाठीचा महत्त्वपूर्ण कायदा २००८ मध्ये फेटाळल्याची बाब आता इतिहासजमा झाल्यानंतर कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे हजारो शेतक-यांचे नाहक बळी जात आहे. त्यामुळे नव्याने २०१७ चा कीकनाशक व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. या कायद्याच्या नव्याने मसुदा करण्यात यावा व यामध्ये आरोग्य, पर्यावरण, सुरक्षित वापर, कीटकनाशकांच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे शेतक-यांचे जात असलेले बळी, जमिनीची व पर्यावरणाची परिमित स्वरूपात होत असलेली हानी व यासाठी भरपाई आदींची कायद्यात तरतूद या करणे महत्त्वाचे आहे.सध्या अस्तित्वात असणारा कीकनाशक नियंत्रण कायदा हा १९६८ व नियम १९७१ मध्ये या सर्व तरतुदी नसल्यामुळेच नियंत्रण करण्यास अपुरा ठरत आहे. त्यामुळे कीटकनाशकांची विषबाधा होण्याच्या किमान १० हजार घटनांची नोंद होत आहे. ज्या कीटकनाशकांच्या वापरावर युनोद्वारा बंदी गालण्यात आली. ही कीटकनाशके देशातंर्गत खुलेआम विकली जातात हे वास्तव असल्याचा आरोप मिशनचे अध्यक्ष तिवारी यांनी केला आहे.

‘सीएससी’च्या हवाल्याने कृषी मंत्रालयच दोषीसेंटर फॉर सायन्स अँड एन्हायरमेंट (सीएसई) या देशातील अग्रगण्य संस्थेच्या अहवालानुसार कीटकनाशकांच्या असुरक्षित वापरास केंद्रीय कृषी मंत्रालय व राज्याचे कृषी मंत्रालय दोषी असल्याचा आरोप शेतकरी मिशनने केला आहे. त्यामुळे कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, आजारपण व शेतकरी व शेतमजुरांंचे मृत्यू टाळण्यासाठी कीटकनाशक व्यवस्थापनातील अटी तत्काळ दुरूस्त होणे महत्त्वाचे असल्याचे राज्यातील शेतकरी मिशनचे किशोर तिवारी व पंजाब राज्यातील शेतकरी मिशनचे अजय जाखर यांनी पंतप्रधानांचे निदर्शनात आणून दिले आहे.

विदेशी वाणावर बंदी, महाबीजने करावा पुरवठाशेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करायचा असल्यास विदर्भ व मराठवाड्यातील रासायनिक शेतीला बंदी घालून विषमुक्त नैसर्गिक शेतीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजारांचे किमान ५ वर्षे अनुदान द्यावे. विदेशी कापसाच्या वाणावर बंदी घालण्यात येऊन बियाण्यांचा पुरवठा कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, कापूस संशोधन केंद्रासह महाबिजने १०० टक्के करावा व शेतकºयांची लूट थांबविण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तयार करावी, यासह अन्य १० महत्त्वपूर्ण घटकांची शिफारस केंद्र व राज्य शासनाला करण्यात आली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती