लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : कोंडेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या व जुना बायपास मार्गालगतच्या वीटभट्ट्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे. अगदी मार्गालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्या, अशी मागणी जोर धरत आहे. त्याची आस, प्रदूषण व धुळीमुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या गंभीर बाबीची मात्र महसूल विभाग दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे.श्रीक्षेत्र कोंडेश्वर देवस्थानची ओळख दूरपर्यंत आहे. नियमित व दर सोमवारी सुटीच्या दिवशी कोंडेश्वरला भाविकांची गर्दी असते. जुना बायपास मार्गालगत वीटभट्ट्या असल्याने या मार्गावरून एमआयडीसीकडे जाणारा मोठा कामगार वर्ग आहे. विद्यार्थीसुद्धा याच मार्गाने महाविद्यालयांमध्ये जात असतात. राखीची धूळ रस्त्यालगतच्या वीटभट्ट्याची आस व प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या सर्व बाबींमुळे खोकला, फुफ्फुसांचे आजार, धुळीची अॅलर्जी, त्वजेचा आजार बळावत आहे. या गंभीर बाबीची दखल घ्यावी, असे बोलले जात आहे. कोंडेश्वर देवस्थानकडे भाविक भक्तांना तोंडाला रूमाल बांधूनच जावे लागते. राखेच्या धुळीने भाविकभक्त सध्या त्रस्त आहेत. महसूल विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहे. रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या तत्काळ हटवाव्यात, अन्यथा प्रशासकीय कारवाई करावी असे संतप्त नागरिकांमध्ये बोलले जात आहे. याबाबत तहसीलदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही. रॉयल्टी भरण्यापूर्वीच महसूल विभागाने याची दखल घ्यावी व रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.गौण खनिज चोरीला उधाणबडनेऱ्यात तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गौण खनिज चोरीस जात आहे. लाखो रूपयांचा चुना गौण खनिजचोरटे शासनाला लावित आहेत. मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. गौण खनिज चोरट्यांवर आळा बसवावा, अशीही मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
वीटभट्ट्या केव्हा हटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 10:25 PM
कोंडेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या व जुना बायपास मार्गालगतच्या वीटभट्ट्या आरोग्यास हानीकारक ठरत आहे. अगदी मार्गालगतच्या वीटभट्ट्या हटविण्यात याव्या, अशी मागणी जोर धरत आहे. त्याची आस, प्रदूषण व धुळीमुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या गंभीर बाबीची मात्र महसूल विभाग दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल त्रस्त नागरिकांनी केला आहे.
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष