गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रशासनाचा प्रस्ताव शासनाकडेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जानेवारीत शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही शासनाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. सलग दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज यामुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. नैराश्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याने शासनाने २५ जून २०१५ मध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, २०१६ मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. जिल्ह्यातील ३४० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्युला कवटाळले. या मृत्यूच्या गर्तेतून जिल्ह्यातील शेतकरी बाहेर यावा यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जानेवारी २०१७ मध्ये पाठविला. मात्र या प्रस्तावाला शासनस्तरावर अद्यापही हिरवी झेंडी मिळालेली नाही. या अभियानाद्वारे ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार होती व शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध योजना व समुपदेशन करण्यात येणार होते. मात्र, शासन याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचा हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. ही आहेत अभियानाची वैशिष्ट्येक्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे.सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदीबाबत भजन, कीर्तन आदींबाबत पथनाट्याद्वारे सर्व गावांमध्ये उपक्रम राबविणे शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व गावांना माहिती देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमी पैशात व अल्प पाण्याद्वारे अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयीसवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे सणासुदीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम राबविणे, यामध्ये शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.
केव्हा राबविणार बळीराजा चेतना अभियान ?
By admin | Published: May 09, 2017 12:11 AM