फोटो जे- ९ बडनेरा
बडनेरा : परिसरातील लोक दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या संख्येत अमरावती शहरात जातात. या मार्गावर शहर बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे. महापालिकेने याचा प्राधान्याने विचार करावा. ज्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळू शकेल.
सोमवारी कोरोना संसर्गापासून बऱ्यापैकी शिथिलता मिळाल्याने बडनेरा शहरासह ग्रामीण भागातील लोक अमरावतीत कामनिमित्त जात आहेत. बडनेरा ते अमरावती प्रवासासाठी प्रतिव्यक्ती दररोज ५० ते ६० रुपये मोजावे लागतात. कोरोनामुळे गोरगरीब सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसस आहे. ऑटोपेक्षा शहर बसचे भाडे अर्ध्या पैशातच होते. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर बडनेरा ते अमरावती या मार्गावर शहर बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. आता रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढली असून, बडनेरा व परिसरातील खेड्यांवरील लोक अमरावतीत जातात. त्यामुळे ऑटोत गर्दी वाढत आहे. सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. तेव्हा संसर्गाची भीती तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेता शहर बसेस सुरू करणे अगत्याचे झाले आहे. शहर बसेस सुरू झाल्यास त्यावरील चालक-वाहकासदेखील रोजगार मिळेल. चार-पाच महिन्यांपासून शहर बसेसची चाके थांबलेली आहेत.