शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट
2
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
3
वारी निघाली लंडनला...!! २२ देशातून १८ हजार किमी प्रवास; पंढरपूर ते लंडन दिंडीचे प्रस्थान
4
मेहुल चोक्सीला फरार घोषित करण्यास विलंब; ईडीचा अर्ज कोर्टात ७ वर्षे प्रलंबित
5
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत
6
Stock Market Today: शेअर बाजार सुस्साट... १६९५ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex; मेटल, रियल्टी शेअर्समध्ये बंपर वाढ
7
‘मंदिरात ताकद असती तर देशात लुटारू आलेच नसते’, समाजवादी पार्टीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
8
डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत
9
आजचे राशीभविष्य - १५ एप्रिल २०२५, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस
10
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
11
दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत
12
लखनौमध्ये रुग्णालयाला मध्यरात्री लागली भीषण आग, प्रसंगावधान दाखवत असे वाचवले २०० रुग्णांचे प्राण   
13
26/11 Mumbai Attack: तहव्वूर राणाची एनआयएकडून रोज ८-१० तास कसून चौकशी, हल्ला होण्यापूर्वी तो कुठे-कुठे फिरला?
14
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
15
लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."
16
Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
17
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
18
लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’
19
तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू; अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य
20
महू ते लंडन... भीमाचे नाव नाही असे ठिकाण नाही, जगभरातील स्मारके देतात आंबेडकरांच्या कार्याची साक्ष

जिल्हा परिषद, नगर परिषदेवर किती दिवस प्रशासकराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:15 IST

Amravati : २५ महिन्यांचा कालावधी; अद्यापही निवडणूक जाहीर झाली नाही

लोकमत न्यूज नेटवर्क मोर्शी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ ते २०२७ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होण्याच्या कार्यकाळाला आता २५ महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही निवडणुका जाहीर झाल्या नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. उमेदवारी मिळेल या हेतूने अनेकांची तयारी आहे. मात्र, अद्यापही या निवडणुकांना सरकारच्या माध्यमातून काहीच निर्णय होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवसेंदिवस लांबणीवर पडत असून कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यात सत्तातरांचे खेळ पाहता नेमके कोणाशी निष्ठावान राहावे, कोणासोबत जावे, कोणत्या पक्षात काम करावे, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. गुडघ्याला बांशिग बांधून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांची कोंडी झाली आहे. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती झाली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने केली होती. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानंतर नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जारी केला होता. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण, गट, गणरचना तसेच जिल्हा अध्यक्षपदाचे आरक्षण या सर्व बाबींची तयारी केली होती. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत निवडणुका लागण्याची शक्यता होती. मात्र, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत निवडणुका नको, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी त्यावेळी घेतली. यातच जून २०२२ मध्ये राज्यात सत्तांतर झाले, हे विशेष.

ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर ओबीसी आरक्षण, पुन्हा नव्याने वॉर्डरचना, प्रभाग पद्धतीत बदल, असे विविध सुधारणा शिंदे सरकारने पुढे आणल्या नंतरही ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप निवडणुकांबाबत अजूनही हालचाली दिसत नाही. यातच सत्तातंरात दोन पक्ष फुटले अन् दोन गटांत विभागाले गेले. पक्ष फुटीचा परिणाम स्थानिक पातळीवरही झाला आहे. यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काही जण गटागटांत गेले असले तरी अनेकांनी आपले पत्ते खुले केलेले नाहीत.

प्रशासकराज लोकशाहीसाठी घातकगेली २५ महिन्यांपासून जिल्हा परिषद पंचायत समिती, नगर परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने नागरिकांना आता संबंधित प्रशासन विभागाकडे जावे लागत आहेत. सर्वसामान्यांना अधिकारी वर्गाशी संपर्क साधताना अडचणी निर्माण होतात. निवडणुका न लावता प्रशासकीय कारभाराचा इतक्या दीर्घ कालावधीत प्रशासकीय कारभारामध्ये लोकप्रतिनिधींचा कोणताही सहभाग नाही. हा सर्व प्रकार लोकशाहीसाठी घातक असून लवकरात लवकर निवडणुकीमध्ये येणारे अडथळे दूर करून निवडणुका घेणे गरजेचे आहे.

कार्यकर्त्यांच्या नजरा खिळल्याआताच लोकसभा निवडून होऊन गेली तरी विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का? त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमके काय करावे, असा प्रश्न कार्यकर्त्याकडून उपस्थित होत आहे. या परिस्थितीमुळे गुडघ्याला बांशिग बांधून रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्यांची कोंडी झाली आहे. 

टॅग्स :AmravatiअमरावतीZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषद