अमरावती : जून महिना इजाळला आणि मान्सूनचे वेध लागले तसेच शाळकरी मुलांना नव्या कोऱ्या पुस्तक व शाळेच्या नव्या गणवेशाचा वेध लागतो. त्यामुळे शाळेची पहिली घंटना वाजणार केव्हा, असा प्रश्न मुले उपस्थित करीत आहेत.
दरवर्षी २६ जूनला सुरू होणाऱ्या शाळा यावर्षी मात्र सुरू होण्याबाबत अद्याप कोणत्याही शासन निर्णय नाही. गतवर्षभर घरात राहून ऑनलाइन शिक्षण घेतलेली मुले आता कंटाळलेली आहेत. त्यांना आपल्या वर्ग खोल्या, ब्रेच, शाळेतील मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आपल्या शिक्षकांकडून वर्गात शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा आहे. त्यामुळे शासन काय निर्णय घेते आणि शाळेची पहिली घंटा कधी वाजते याकडे शाळकरी मुले आणि पालकांचे तसेच शिक्षकांची लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गत वर्षभरापासून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्यात. पहिली ते सातवी व आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी नंतरचे सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात आले. त्यावर सराव परीक्षा सुद्धा घेण्यात आल्यात. अनेक वेळा नेटवर कनेक्टिव्हिटीच्या अडसरामुळे मुलांचा शाळेत प्रत्यक्ष होणारा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष नेट कनेक्टिव्हिटीतील अभ्यासक्रम यात बरीच तफावत आहे. त्याचे आता मूल्यमापन होत आहे. पहिली ते आठवीपर्यंत वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच पास करावे, असा शासनाने आदेश काढला. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. नववी आणि दहावीच्या गुणांकनानुसार पास करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला. यंदाच्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात जून महिना सुरू झाला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाकडून आलेला नाही. काही दिवसापूर्वी येत्या काही दिवस आता नवीन पद्धतीने शाळा सुरू होणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत कुठलाही निर्णय सध्यातरी घेण्यात आला नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शाळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार याबाबत सस्पेन्स आहे.
बॉक्स
निर्णयाकडे लक्ष
कोरोनाच्या साथीमुळे गेले संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात गेले गुणांकनानुसार पद्धतीमुळे काही अंशी हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याबाबत काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आता नवीन वर्षात कशा पद्धतीने शाळा सुरू होतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.